Homeव्हिडिओ बातम्यासभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, भारतीय जनता पार्टी...
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, भारतीय जनता पार्टी खर्डा गटाच्या वतीने मा.ना.प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप:
भारतीय जनता पार्टी खर्डा गटाच्या वतीने मा.ना.प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम 
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला जात आहे. भारतीय जनता पार्टी खर्डा गटाच्या वतीने मा.ना.प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्रीच्या स्वरूपात भक्कम पाठबळ देण्याचा हेतू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
.दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जि. प. प्रा. शाळा, खर्डा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलालशेठ खिवंसरा, सरपंच संजीवनीताई पाटील, माजी सरपंच संजय गोपाळघरे, बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील,युवा नेते बाजीराव गोपाळघरे, केशव वनवे, नानासाहेब गोपाळघरे, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे, महालिंग कोरे,
महेश दिंडोरे, राजू मोरे, भागवत सुरवसे, बाळासाहेब गोपाळघरे, कांतीलाल डोके, अण्णासाहेब शिंदे, रामदादा भोसले, नामदेव गोपाळघरे, राजू डोके, लक्ष्मण भोसले, दिलीप सुरवसे, भीमा सुरवसे, बबन सुरवसे, हरिदास गोपाळघरे, मच्छिंद्र येवले, दिगंबर सातारकर, टिल्लूशेठ पंजाबी, भैय्या चौगुले,अंकुश वारे,अनिल दराडे,सचिन सुरवसे,रोहिदास वनवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर गोपाळघरे यांनी केले व मुख्याध्यापक आंधळकर सर यांनी आभार मानले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!