Homeव्हिडिओ बातम्यापुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे खाते उघडले ; संस्था नोंदणीचा मार्ग...
पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे खाते उघडले ; संस्था नोंदणीचा मार्ग मोकळा. *मुख्यप्रर्वतक वर्षाराणी पांडूरंग उबाळे* राम शिंदे यांच्या पारड्यात मताचे वजन वाढले.
पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे खाते उघडले ; संस्था नोंदणीचा मार्ग मोकळा.
*मुख्यप्रर्वतक वर्षाराणी पांडूरंग उबाळे*
राम शिंदे यांच्या पारड्यात मताचे वजन वाढले.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे खाते मागील संस्था प्रस्ताव दि 17/04/2017 रोजी साहायक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांच्याकडे दाखल केला होता.
सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांनी दि 19/3/2024 रोजी मंजूरी दिली व 15/4/2024 रोजी साहायक निबंधक सहकारी संस्था जामखेड यांनी खाते उघडनेयाच पत्र दिले होते परंतु जिल्हा बॅंक आहिल्यानगर यांनी दि 10/6/2024 रोजी पत्र पाठवलं दि 24/2/2022 चा ठराव क्रमांक 15 अन्वये खाते उघडता येणार नाही असे कळवले. याबाबत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी तक्रार दार मुख्यप्रवर्तक वर्षाराणी पांडूरंग उबाळे यांनी अर्जात नमूद संस्था खाते उघडने हि बाब बॅंक स्तरावर असून कार्यवाही तात्काळ करावी व बॅंक मंजूर उपविधी व महाराष्ट्र सहकारी आधी नियम 1960 व नियम 1961 मधील तरतुद व शासन परिपत्रक यांचा भंग होनार नाही याची दक्षता घ्याला सांगीतले.
तरी पण खाते उघडले नाही मग शेवटी मुख्यप्रवर्तक मा.उच्च न्यायालय खंडपीठ अैारंगाबाद येथे रिट पिटीशन 2959/2025 दाखल केली असून सध्या स्थीत प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे दोन वर्षे अशा प्रकारे जिल्हा बॅक आहिल्यानगर यांनी संस्था मुख्यप्रर्वतक व सभासद शेतकरी यांची पिळवणूक करून कर्जा पासून व पंजाबराव कृषी पंत पुरवठा धोरण शुन्य ट्क्के व्याज दर या योजने पासून व कर्ज माफी सारख्या योजने पासून वंचित ठेवले. दोन वर्षे विविध कार्यालय न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावल्या दरम्यानच्या काळात कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आ राम शिंदे विधानपरिषद सभापती झाले आणी मुख्यप्रवर्तक पुण्यश्लोक वि.का.सेवा सोसायटी चोंडी यांची लक्षवेधी दाखल करून आमदार प्रविण दरेकर व श्रीकांत भारती यांनी हि लक्ष वेधी मांडली व सभापती राम शिंदे यांनी आदेश दिले.
व उत्तरात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तात्काळ खाते उघडण्याचे आदेश दिले एवढे दिवस प्रलंबित असणारा विषय मार्गी लावला.
कर्जवाटप करण्याचे आदेश देण्यात आले.सदर संस्थेचे खाते उघडल्यामुळे संस्था नोंदणीचा पुढील मार्ग मोकळा झाला असून परिषद सभापती राम शिंदे यांच्या आदेशामुळे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाला चांगलीच चपराक बसली आहे.
पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चोंडीचे मुख्य प्रवर्तक वर्षाराणी पांडुरंग उबाळे यांचे विविध स्थरातून अभिनंदन होत आहे.
———–
राम शिंदे यांच्या पारड्यात मत वाढले
———
सदर संस्थेतचे 1 जानेवारी 2026 रोजी खाते उघडले आहे. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत असून येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरच जामखेड तालुक्यात एका मताची भर पडणार असून विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या पारडयात मताचे वजन वाढलेले दिसत आहे. अशा प्रलंबित असणाऱ्या संस्थांचा मार्ग मोकळा झाल्यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!