Homeव्हिडिओ बातम्यासनराईज शैक्षणिक संकुलात माता-पालक व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

सनराईज शैक्षणिक संकुलात माता-पालक व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

सनराईज शैक्षणिक संकुलात माता-पालक मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी

सनराईज मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशन फौडेशन साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज व सनराईज् इंग्लिश स्कूल येथे दि. १७ जानेवारी रोजी माता-पालक मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अंजली मिलिंद जीवडे, तर प्रमुख पाहुणे सौ. शीतल भोंडवे या उपस्थित होत्या,मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पालक मेळाव्याचे प्रास्ताविक सौ. अर्चना गिरमे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अनेक माता-पालकांनी मनोगतातून शाळेबाबतच्या अपेक्षा व सूचना मांडल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण भोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. तनुजा सांगळे यांनी केले.

पालक मेळाव्यानंतर मातांसाठी संगीत खुर्ची, बुक बॅलन्स, रनिंग रेस, उखाणे आदी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते ,या खेळांमध्ये मातांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमात आनंदाची रंगत भरली. संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. अस्मिता जोगदंड-भोरे यांच्या हस्ते विजेत्या मातांना बक्षिसे व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.


या कार्यक्रमास संचालक प्रा. तेजस दादा भोरे,भाऊसाहेब भोईटे,अंजली कात्रजकर,विद्या डोंगरे,सानिया सय्यद,कदम मॅडम,पूनम तुपेरे शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!