सत्य परेशान हो सकता है मगर पराभुत नही :- आमदार रोहित पवार डी कारवाईतुन न्यायालयाने आ रोहित पवारांची केली मुक्तता..
सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत नहीं :- आमदार रोहित पवार
ईडी कारवाईतुन आ. रोहित पवारांची न्यायालयाने केली मुक्तता
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) आणि शिखर बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवार यांना ईडीच्या (प्रवर्तन संचालनालय) कारवाईतून न्यायालयाने पूर्ण मुक्ती दिली आहे.
घोटाळ्याच्या आरोपांतून वगळण्यात आल्यानंतर आ. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. तसेच पुढील राजकीय भूमिकेबाबत घायल हू इसलिए घातक हू असा ठाम इशारा दिला.रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की , “न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं मी पहिल्यापासून सांगत होतो.. त्यानुसार अखेर घोटाळ्याच्या आरोपातून वगळत #ED च्या फेऱ्यातून मा. न्यायालयाने सुटका केली, याबाबत मा. न्यायालयाचे मनापासून आभार!”
त्यांनी पुढे सांगितले, “सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत नहीं.. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..!” मात्र, या प्रकरणातील नाहक त्रासावरून “घायल हूँ, इसलिए घातक हूँ” असा विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा देत पुढील पावलांबाबत ठाम भूमिका घेतली.
२०१९ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेल्या FIR ने हे प्रकरण सुरू झाले.
सहकारी साखर कारखान्यांचे कथित अनियमित लिलावांमुळे खासगी कंपन्यांना अनुचित फायदा झाल्याचा आरोप होता. ईडीने PMLA २००२ अंतर्गत रोहित पवार, बारामती ॲग्रो लिमिटेड आणि सहकाऱ्यांविरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले.
५० कोटीहून आधिक मालमत्ता जप्त झाली – छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारती, यंत्रसामग्रीचा समावेश. एकूण १२१.४७कोटींच्या मालमत्तेवर कारवाई झाली होती.
रोहित पवार यांनी याला राजकीय दबाव म्हटले होते. “मी काही लोकांचे ऐकले नाही म्हणून ही कारवाई,” असे ते म्हणाले होते. ईओडब्ल्यूने क्लोजर रिपोर्ट दिला असून, विशेष PMLA न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे.
हे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, #Rohit PawarInnocent ट्रेंड करत आहे. विरोधकांकडून मात्र निर्णयावर शंका उपस्थित होत आहेत. “घायल हूँ, इसलिए घातक हूँ” हे उद्गार राज्य राजकारणात नव्या चळवळीला जन्म देतील, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञ सांगतात. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे मानले जात आहे.
ईडी किंवा विरोधकांकडून आव्हान येईल का, हे पाहणे औंखी आहे. रोहित पवार यांच्या या विजयाने पक्षात उत्साह वाढला असून, ते आता अधिक आक्रमक भूमिकेत दिसतील. स्थानिक नेत्यांनी समर्थन देत “न्यायाला विजय” सांगितले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!