Homeव्हिडिओ बातम्याशेतकरी हितासाठी जवळा येथे माती परीक्षण केंद्र हवे : प्रशांत शिंदेंच्या मागणीला...

शेतकरी हितासाठी जवळा येथे माती परीक्षण केंद्र हवे : प्रशांत शिंदेंच्या मागणीला सभापती प्रा राम शिंदे यांचा होकार :

जवळ्यात शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करण्याबाबत हालचाली वाढल्या!
भाजप नेते प्रशांत शिंदे यांच्या मागणीला सभापती प्रा.राम शिंदे यांचा ग्रीन सिग्नल!

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून भाजप नेते प्रशांत शिंदे यांचे  सकारात्मक पाऊल पुढे पडताना दिसत आहे. तालुक्यात शाश्वत शेतीसाठी अत्यंत गरजेचे असलेले शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. जवळा (ता. जामखेड) येथे हे केंद्र स्थापन व्हावे यासाठी भाजपचे युवा नेते प्रशांत (भाऊ) शिंदे यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. या मागणीनंतर प्रा. राम शिंदे यांनी कृषी विभागाकडे लेखी शिफारस केली आहे.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून “मौजे जवळा, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे शेतकऱ्यांसाठी शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करावे तसेच पर्जन्य मापक यंत्र बसविणेबाबत उचित कार्यवाही करावी,” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

जवळा येथे शासकीय माती परीक्षण केंद्र मंजूर करावे या विषयावर भाजप युवा नेते प्रशांत शिंदे यांनी सहा दिवसांपुर्वी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.सभापती प्रा राम शिंदे यांनी हा मुद्दा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याचे सांगत, सदर केंद्र मंजुर करावे अशी आग्रही मागणी प्रा राम शिंदे यांच्याकडे केली होती. आता या मागणीला यश येताना दिसत आहे. जवळा येथे माती परीक्षण केंद्र मंजूर झाल्यास जामखेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.जवळा येथे माती परीक्षण केंद्र मंजूर झाल्यास जामखेडसह कर्जत तसेच शेजारच्या तालुक्यातील शेतकरीवर्गाला मोठा फायदा होणार आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!