Homeव्हिडिओ बातम्यावंचितचे युवानेते सुजात आंबेडकर बद्दल बदनामीकारक वक्तव्य, भाजप कार्यकर्ता तुषार बोथरा ला...

वंचितचे युवानेते सुजात आंबेडकर बद्दल बदनामीकारक वक्तव्य, भाजप कार्यकर्ता तुषार बोथरा ला अटक , वंचितचे तीव्र आंदोलन ; पोलीसांनी घेतली तातडीने दखल

वंचितचे युवानेते सुजात आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक व्यक्तव्य,

भाजप कार्यकर्ता तुषार बोथरा ला अटक,

वंचितचे तीव्र आंदोलन;पोलीसांनी तातडीने घेतली दखल

जामखेड प्रतिनिधी

फेसबुक या सोशल मिडीया प्लॅटफार्मवर एक अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक कमेंट केल्याप्रकरणी जामखेड येथील भाजप कार्यकर्ता तुषार बोथरा याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने अटक केली आहे .

गून्हा दाखल करुन अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने वंचितचे राज्य प्रवक्ते अँड डॉ.अरूण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलिस स्टेशन येथे तीव्र स्वरूपात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले .
शोसलमिडियावरुन कायम वादग्रस्त पोस्ट शेअर करणारा तुषार बोथरा याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव तसेच पक्षाचे राज्याचे नेते आदरणीय सुजात आंबेडकर यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवरील कमेट केली आहे .

त्यामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि वारसाचा घोर अपमान झाला असुन,संपुर्ण आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत.या वादग्रस्त कमेंट /वक्तव्यामुळे जामखेड शहर व परिसरातील आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट असुन,शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून कायदा व सुव्यवस्था बिघडण्यापूर्वी सदर इसम तुषार बोथरा याच्यावर आयटी अँक्ट व संबंधित कायदेशीर कलमांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्याला ताब्यात घ्यावे.अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने करण्यात आली होती .जर या इसमावर त्वरित कडक कार्यवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी व समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

. वंचित बहुजन आघाडीच्या या तीव्र आंदोलनामुळे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी तातडीने दखल घेऊन सदर आरोपी तुषार बोथरा याला अटक केली आहे. वंचितच्या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट),संभाजी बिग्रेड,मुस्लिम पंच कमिटी,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंच,ओबीसी संघटना आदिंनी जाहीर पाठिंबा देत सदरील घटनेचा निषेध केला आहे.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते नगरसेवक एड डॉ.अरूण जाधव,जामखेड नगरपरिषदेच्या नगसेविका सौ.संगिताताई भालेराव,नगरसेवक प्रशांत राळेभात,नगरसेवक वसीम सय्यद,मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी,संभाजी बिग्रेडचे अवधूत पवार,वकील बार संघटनेचे अध्यक्ष ॲड हर्षल डोके,भारतीय बौध्द महासंघाच्या सुरेखाताई सदाफुले,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंचचे अध्यक्ष गणेश जाधव,सामाजिक कार्यकर्ते पञकार रिजवान बागवान,लोकअधिकार आंदोलनाचे बापू ओव्हळ,मुख्तार सय्यद,जुबेर शेख,अंकल घायतडक,नितिन जाधव,सतिष जाधव,परशुराम,जाधव,आदिल शेख,दिलिप गायकवाड,सुमित भालेराव,अक्षय समुद्र,मनोज घायतडक,शेखर कांबळे,योगेश बनसोडे,आरीफ बागवान,सुभाष फुलमाळी सर,विक्की गायकवाड,गणेश घायतडक,बाबा ओव्हळ,अनिल सदाफुले,सागर कांबळे आदि.पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!