Homeव्हिडिओ बातम्यागोळ्या घालून ठार मारीन ; धमकी व खंडणीचा बबलू गोलेकर विरुद्ध गुन्हा...

गोळ्या घालून ठार मारीन ; धमकी व खंडणीचा बबलू गोलेकर विरुद्ध गुन्हा दाखल ,तालुकाध्यक्षाचा धमकी ;तालुक्यात खळबळ

 गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी — कुख्यात गुंड बबलू गोलेकर विरुद्ध धमकी व खंडणीचा गुन्हा दाखल

तालूकाध्यक्षाला धमकी; तालुक्यात खळबळ…

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रहिवासी व स्थानिक गुन्हेगारी विश्वात नाव असलेला कुख्यात गुंड रोहित उर्फ बबलू गोलेकर याच्यावर खर्डा पोलीस ठाण्यात दिनांक १३ मे २०२६ रोजी खंडणीची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर वय( ४५)रा .सुर्वेवाडी खर्डा ता.जामखेड यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की खर्डा येथील रहिवासी कुख्यात गुंड बबलू गोलेकर याने दि १२ मे २०२६ रोजी मी खर्डा येथे असताना व्हाट्सअप्प कॉल करून म्हणाला की,

तुझ्यामुळे माझे खूप वाटोळे झाले; तुझ्यामुळे माझा 20 लाख रुपयांचा खर्च झाला आहे; माझं लग्नही मोडले आहे; तुला सोडणार नाही; तुला वाचायचे असल्यास 20 लाख रुपये खंडणी दे; नाहीतर तुला 10 गोळ्या घालून मारीन ” यांसारख्या धमक्या, शिवीगाळ व दमदाटीचा हेतु ठेवला. मी त्याला सांगितले की त्याच्यावर आधी गुन्हे दाखल आहेत व मी त्याला वाचविणार नाही. त्यावरून त्याने पुन्हा “तुझा ट्रॅप लावलेला आहे; जर तू 20 लाख नाही दिले तर तुला संपवून टाकीन” असा गैरधर्मक व धमकीपूर्ण मजकूर बोलून संभाषण बंद केले.

त्याच दिवसाच्या रात्री सुमारे 10:51–10:52 च्या काळात माझ्या व्हॉट्सअॅपवर आणखी 3 वेळा कॉल आले. भितीमुळे मी ते कॉल उचलले नाहीत. त्यानंतर 11:06 वाजता (11:06 pm) त्याने माझ्या व्हॉट्सअॅपवर “फोन कर मला बोलायचे आहे, वाटुळ केलं माझ” असे संदेश पाठविला. याबाबत खर्डा पोलिसांनी पोलीसांनी गुन्ह्याची नोंद (खंडणी – अँ extortion) भारतीय न्याय संहिता BNS ३०८(५) BNS ३५१(२) BNS ३५२ नुसार गुन्हा दाखल केला असून खर्डा पोलिस तपास करीत आहेत .

बबलू गोलेकर विरोधात खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गून्हे दाखल असुन खर्डा शहरातून स्थानबद्ध केले होते तसेच जिल्हा पुणे विभागातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर खंडणीचा एक प्रकरण आधी नोंदले गेले आहे. आतापर्यंत पोलिसांच्या आकडेवारीनुसार बबलू गोलेकर अनेकदा फरार राहिला असून पोलिसांना तो चकवा देत आला आहे.

या तक्रारीमुळे स्थानिक राजकीय मंडळींमध्ये खळबळ उडाली आहे. विजयसिंह गोलेकर हे स्थानिक राजकीय नेते असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित आहेत; त्यामुळे नेत्याला तोंडावर थेट धमकी दिल्याचे प्रकार स्थानिक राजकीय वातावरणात खबळजनक आहे.

काही राजकीय कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांना भीतीची पेरणूक होण्याची चिन्ता व्यक्त होत आहे आणि ते पोलिसांकडून तातडीने तपशीलवार खुलासा व तालुकाध्यक्षाच्या सुरक्षेबाबत वेळेत पावले उचलण्याची मागणी करत आहेत.

खर्डा येथील कुख्यात गुंड बबलू गोलेकर विरोधातील नवी खंडणीची तक्रार स्थानिक राजकारण आणि समाजात चिंतेचे कारण ठरली आहे. पोलिसांनी तातडीने पारदर्शक चौकशी व तालुकाध्यक्षाच्या सुरक्षेबाबत तसेच आरोपीच्या फरार अवस्थेचा शोध घेण्याचे काम अधिक वेगाने करावे, अशी अपेक्षा स्थानिकांना आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!