Homeव्हिडिओ बातम्यारस्त्यावर पडलेल्या विज तारेचा शाँक लागुन बैलांचा मृत्यू ,पाचजण बचावले .भरपाई देण्याचे...

रस्त्यावर पडलेल्या विज तारेचा शाँक लागुन बैलांचा मृत्यू ,पाचजण बचावले .भरपाई देण्याचे महावितरणचे आश्वासन

रस्त्यावर पडलेल्या तारेचा शाँक लागुन बैलांचा मृत्यू

गाडीतील पाचजण बचावले :

भरपाई देण्याचे महावितरणचे आश्वासन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील साकत शिवारात शेतात कामासाठी बैलगाडी घेऊन जात असताना रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि शाँक लागून दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली .

वादळ वारयाने साकत शिवारात शेतात विजेच्या तारा तुटुन पडल्या आहेत . दि २५ रोजी साकत येथील संभाजी नवनाथ वराट हे कडभनवाडी बारले शिवारात शेतीच्या कामासाठी बैलगाडी घेऊन चालले होते. बैलगाडीत पाच जण बसले होते. रस्त्यावर विजेची तार तुटुन पडलेली होती. या तारेवरून बैलगाडी जात असतांना बैलांचा तारेला स्पर्श होताच शाँक लागुन बैलांचा जाग्यावरच मृत्यू झाला. सुदैवाने याच बैलगाडीतील पाच जण थोडक्यात वाचले.यावेळी संभाजी वराट बरोबर बैलगाडीतून शहाजी महादेव वराट, संगिता शहादेव वराट, सोहम संभाजी वराट, एकनाथ नारायण वराट असे पाच जण बैलगाडीत बसलेले होते .

या घटनेत दोन बैलांचा मृत्यू झाल्याने सुमारे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .पेरणी तोंडावर आली असताना बैल गेले .आता नांगरणी, मोगडा पाळी कशी करायची? सरकारने तातडीने मदत द्यावी,” अशी मागणी संभाजी वराट यांनी केली आहे यावेळी संभाजी वराट यांना अश्रू अनावर झाले होते .

घटनेची माहिती मिळताच महावितरण चे वायरमन सावंत, पशुवैद्यकीय अधिक्षक डॉ. मोटेगावकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. आता मृत बैलासाठी शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्याला महावितरणकडून मदत मिळण्यासाठी सर्व प्रकिया लवकरात लवकर केली जाईल असे महावितरण चे अभियंता शिंदे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!