Homeव्हिडिओ बातम्यामोहन पवार यांची प्रभाग क्रमांक सात मध्ये गाठी भेटी चौकशी चर्चा प्रचारात...

मोहन पवार यांची प्रभाग क्रमांक सात मध्ये गाठी भेटी चौकशी चर्चा प्रचारात आघाडी :केलेल्या कामांमुळे मोहन पवार लोकांच्या मनामनात

मोहन पवार यांची प्रभाग ७ मध्ये भेटी गाठी व चर्चा करत प्रचारात आघाडी

केलेले कामांमुळे मोहन पवार लोकांच्या मनामनात

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक ७ मधून नगरसेवक पदाचे उमेदवार मोहन पवार यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेत चौकशी करत प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ प्रांजलताई अमित चिंतामणी व अमित चिंतामणी यांनी आपल्या सहकारयांसह प्रभाग क्रमांक सात मध्ये मोहन पवार यांच्या प्रचार्थ प्रभागात नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या. यावेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मोहन पवार यांनी नगरसेवक काळात काम करत लोकांच्या अडीअडचणीत काळात गरजवंतांना मदत करत लोकांचा विश्वास संपादन केला आहे. केलेले काम व लोकांच्या विश्वासाच्या जोरावर पुन्हा नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मोहन पवार सर्वपरिचित बहूजन विचाराचे व्यक्तिमत्व आहे. विकासाची दूरदृष्टी आहे. प्रभाग क्रमांक सात मधून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!