राजेंद्र गोरे व हिना इस्माईल सय्यद यांची प्रभाग क्रमांक ८ मध्ये गाठी भेटी चर्चा करत प्रचारात आघाडी
नागरिकांचा व महिलांचा प्रतिसाद
समाजातील सर्व समाज घटकांसाठी काम करत आहे :- इस्माईल सय्यद
लोकांच्या विश्वासाच्या व लोकसंपर्काच्या जोरावर प्रभाग ८ मध्ये हिना इस्माईल सय्यद व राजेंद्र गोरे यांची .
महिलांना स्वाभिमान, रोजगार व सुरक्षा देण्यासाठी हिना इस्माईल सय्यद प्रभाग आठ मधुन निवडणूक रिंगणात
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक ८ मधुन उच्च शिक्षित उमेदवार हिना इस्माईल सय्यद व राजेंद्र गोरे यांनी आपल्या प्रभागातील लोकांच्या भेटी गाठी घेत चर्चा करत प्रचारात आघाडी घेतली आहे. ठिकठिकाणी नागरिकांचा व महिलांचा मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हिना या वसीम शेख यांच्या पत्नी आहे तर माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद यांची मुलगी आहे. 
हिना सय्यद यांचे वडील माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद व राजेंद्र गोरे हे प्रभागात एकत्रित प्रचार करतांना दिसत आहेत. इस्माईल सय्यद यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना नुरानी कॉलनीसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला तपनेश्वर रोड ते खाडेनगर दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले होते. तसेच तत्कालीन सरपंच यांचे सहकार्यातून नुरानी कॉलनी पर्यंत काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. समाजातील लोकांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करत असतात. तसेच इस्माईल सय्यद यांचे जावई वसीम शेख प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना आरोग्य माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून औषध वाटप करण्याचे काम करत आहे. तसेच वसीम शेख यांचे बंधू सलिम शेख हेही शासनाच्या योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी काम करत आहेत. नागरिक व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम करत आहेत.
राजेंद्र गोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राहिले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गरजु लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्याची काम केले आहे. आपल्या सामाजिक कामांच्या माध्यमातून लोकांसंपर्कात आहेत. लोकांच्या विविध कामांच्या व विश्वासामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये राजेंद्र गोरे व हिना सय्यद यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– – – – – – –
प्रभाग ८मध्ये नागरि मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग आठ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार हिना इस्माईल सय्यद , राजेंद्र आजिनाथ गोरे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संध्या शहाजी राळेभात यांना भरघोस मतदान करून विजयी करावे असे आवाहन इस्माईल सय्यद यांनी केले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
