Homeव्हिडिओ बातम्यामृत्युनंतरही जात आडवी येते तेव्हा...! अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने मृतदेह दोन दिवस...

मृत्युनंतरही जात आडवी येते तेव्हा…! अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने मृतदेह दोन दिवस ताटकळला :

 

मृत्यूनंतरही जात आडवी येते तेव्हा…

अंत्यविधीसाठी जागा न मिळाल्याने मृतदेह दोन दिवस ताटकला:

जामखेड प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे दफनविधी करण्यास गावातील काही लोकांनी जागा नाकारल्याने संतप्त नातेवाइकांना मृतदेह तहसील कार्यालयात आणावा लागला. दोन दिवस हा मृतदेह अंत्यविधीसाठी ताटकळून होता.

पाटेवाडी येथील आदिवासी समाजातील बेबी शैनास पवार (वय ६५) यांचा रविवारी मृत्यू झाला. गावात पूर्वीपासून ज्या जागेत दफनविधी पार पडत
होता तेथे मृतदेह दफनविधीसाठी आणला होता. गावातील काही लोकांनी तेथे विधी करण्यास विरोध दर्शविला. मयत कुटुंबाला व त्यांच्या नातेवाइकांना धमकी व धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे रविवारी पुन्हा मृतदेह घरी नेण्यात आला. सोमवारी सकाळी पुन्हा नातेवाईक दफनविधीसाठी आले; पण तरीही विरोध करण्यात आला. ही बाब वंचित बहुजन आघाडीचे ॲड. अरुण जाधव, तुकाराम पवार, सोमनाथ भैलुमे, ललिता पवार, शीतल पवार यांना समजल्यानंतर त्यांनीही गावातील संबंधित व्यक्तींशी संपर्क करून त्यांना समजावून सांगितले; पण त्यानंतरही विरोध करण्यात आला.

त्यानंतर मृतदेह तहसील
कार्यालयात आणण्यात आला. गावात दफनविधीसाठी जागा द्या अन्यथा कार्यालयासमोर दफनविधी करू, अशी भूमिका न
अँड अरुण जाधव यांनी घेतली. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी तहसीलदार कार्यालयातील सहायक महसूल
अधिकारी सुरेश बरबडे, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी जमावास शांत केले. अखेर प्रशासनाने गावातच ठरलेल्या जागेत दफनविधी करण्यास सांगितले. त्यानंतर रात्री पोलिस बंदोबस्तात मृतदेह दफनविधीसाठी पुन्हा गावात नेण्यात आला. दफनविधी करण्यास विरोध करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने नातेवाइकांना दिले आहे. मात्र, रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. रात्री दफनविधी झाल्यानंतर नातेवाइकांना पुन्हा पोलिस स्टेशनला बोलावले असून त्यानंतर गुन्हा दाखल होईल, असे सांगण्यात आले.
-चौकट – –
पाटेवाडी ता कर्जत जि अहिल्यानगर या घटनेत नेमके हेच दिसले. मृत्यूनंतरही त्यांना गावात अंत्यसंस्कार करू दिले नाहीत. ही फक्त एका कुटुंबाची किंवा एका गावाची घटना नाही. ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाची आणि समाजातील दुटप्पी मानसिकतेचे जिवंत उदाहरण आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!