Homeव्हिडिओ बातम्यामीनी मंत्रालय निवडणूक :जामखेडची ताकद वाढली :जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभाग रचना...

मीनी मंत्रालय निवडणूक :जामखेडची ताकद वाढली :जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

मिनी मंत्रालय निवडणूक

जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचना जाहीर

गट- खर्डा साकत जवळा

गण- साकत, शिऊर, खर्डा, नान्नज, जवळा, आरणगाव

जामखेड प्रतिनिधी –

मिनी मंत्रालय” म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ती जिल्ह्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी काम करते.

जिल्हा परिषद म्हणजे काय?:

जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकास योजना राबवते आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करते.

जामखेड तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणासाठी आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जर कोणाची हरकत असेल तर सात दिवसांत दि. २१ पुर्वी जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात कराव्यात असे आदेशात म्हटले आहे.जामखेड मधील ३ गट आणि ६ गण खालीप्रमाणे आहेत.गटाचे नाव ७३ साकत गणाचे नाव १४५ शिऊर या गणामध्ये मोहा, सावरगाव, राजुरी, डोळेवाडी, शिऊर, घोडेगाव, झिक्री, धोंडपारगाव, सारोळा, काटेवाडी, पाडळी खुरदैठण अशा दहा ग्रामपंचायत तर १२ गावे समाविष्ट आहेत.गणाचे नाव १४६ साकत साकत,कोल्हेवाडी, पिंपळवाडी, देवदैठण, नाहुली,नायगाव, जायभायवाडी, बांधखडक, तेलंगशी, आनंदवाडी, पिंपळगाव आळवा, धामणगाव असे एकूण दहा ग्रामपंचायत तर १२ गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषद गटाचे नाव ७४ खर्डा गणाचे नाव १४७ खर्डा यामध्ये खर्डा, नागोबाची वाडी, मुंगेवाडी, पांढरेवाडी, दरडवाडी, दिघोळ, माळेवाडी, मोहरी, जातेगाव, लोणी बाळगव्हाण अशा सहा ग्रामपंचायत तर ११ गावाचा समावेश आहे. गणाचे नाव १४८ नान्नज नान्नज, आपटी, वाकी, सातेफळ, पिंपळगाव उंडा, तरडगाव, वंजारवाडी, दौंडाचीवाडी, सोनेगाव, जवळके, धनेगाव, राजेवाडी, गुरेवाडी, महारूळी, पोतेवाडी, वाघा अशा तेरा ग्रामपंचायत तर १६ गावे समाविष्ट आहेत. ७५ जवळा जिल्हा परिषद गट१४९ अरणगाव गणात डोणगाव, अरणगाव, पारेवाडी, फक्राबाद, पाटोदा, खामगाव, भवरवाडी, धानोरा, वंजारवाडी, रत्नापूर, सांगवी, कुसडगाव, सदरवाडी, खांडवी, डिसलेवाडी अशा आठ ग्रामपंचायत तर १४ गावे समाविष्ट आहेत.१५० जवळा गणात मुंजेवाडी, चोभेवाडी, बोर्ले, चौंडी, आघी, मतेवाडी, जवळा, कवडगाव, गिरवली, पिंपरखेड, हसनाबाद, बावी, हाळगाव अशा ११ ग्रामपंचायत तर १३ गावे समाविष्ट आहेत.

अशा प्रकारे तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणासाठी आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जर कोणाची हरकत असेल तर सात दिवसांत दि. २१ पुर्वी जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात कराव्यात असे आदेशात म्हटले आहे.

मिनी मंत्रालय निवडणूक

जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचना जाहीर

गट- खर्डा साकत जवळा

गण- साकत, शिऊर, खर्डा, नान्नज, जवळा, आरणगाव

जामखेड प्रतिनिधी

मिनी मंत्रालय” म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ती जिल्ह्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी काम करते. जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकास योजना राबवते आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करते.

जामखेड तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणासाठी आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जर कोणाची हरकत असेल तर सात दिवसांत दि. २१ पुर्वी जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात कराव्यात असे आदेशात म्हटले आहे.जामखेड मधील ३ गट आणि ६ गण खालीप्रमाणे आहेत.गटाचे नाव ७३ साकत गणाचे नाव १४५ शिऊर या गणामध्ये मोहा, सावरगाव, राजुरी, डोळेवाडी, शिऊर, घोडेगाव, झिक्री, धोंडपारगाव, सारोळा, काटेवाडी, पाडळी खुरदैठण अशा दहा ग्रामपंचायत तर १२ गावे समाविष्ट आहेत.गणाचे नाव १४६ साकत साकत,कोल्हेवाडी, पिंपळवाडी, देवदैठण, नाहुली,नायगाव, जायभायवाडी, बांधखडक, तेलंगशी, आनंदवाडी, पिंपळगाव आळवा, धामणगाव असे एकूण दहा ग्रामपंचायत तर १२ गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषद गटाचे नाव ७४ खर्डा गणाचे नाव १४७ खर्डा यामध्ये खर्डा, नागोबाची वाडी, मुंगेवाडी, पांढरेवाडी, दरडवाडी, दिघोळ, माळेवाडी, मोहरी, जातेगाव, लोणी बाळगव्हाण अशा सहा ग्रामपंचायत तर ११ गावाचा समावेश आहे. गणाचे नाव १४८ नान्नज नान्नज, आपटी, वाकी, सातेफळ, पिंपळगाव उंडा, तरडगाव, वंजारवाडी, दौंडाचीवाडी, सोनेगाव, जवळके, धनेगाव, राजेवाडी, गुरेवाडी, महारूळी, पोतेवाडी, वाघा अशा तेरा ग्रामपंचायत तर १६ गावे समाविष्ट आहेत. ७५ जवळा जिल्हा परिषद गट१४९ अरणगाव गणात डोणगाव, अरणगाव, पारेवाडी, फक्राबाद, पाटोदा, खामगाव, भवरवाडी, धानोरा, वंजारवाडी, रत्नापूर, सांगवी, कुसडगाव, सदरवाडी, खांडवी, डिसलेवाडी अशा आठ ग्रामपंचायत तर १४ गावे समाविष्ट आहेत.१५० जवळा गणात मुंजेवाडी, चोभेवाडी, बोर्ले, चौंडी, आघी, मतेवाडी, जवळा, कवडगाव, गिरवली, पिंपरखेड, हसनाबाद, बावी, हाळगाव अशा ११ ग्रामपंचायत तर १३ गावे समाविष्ट आहेत.

अशा प्रकारे तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणासाठी आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जर कोणाची हरकत असेल तर सात दिवसांत दि. २१ पुर्वी जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात कराव्यात असे आदेशात म्हटले आहे. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!