Homeव्हिडिओ बातम्याजामखेड मोबाईल असोसिएशनचे असेही सामाजिक कार्य :भव्य रक्तदान शिबिराद्वारे जपली सामाजिक बांधिलकी

जामखेड मोबाईल असोसिएशनचे असेही सामाजिक कार्य :भव्य रक्तदान शिबिराद्वारे जपली सामाजिक बांधिलकी

जामखेड मोबाईल असोसिएशनने जपली सामाजिक बांधिलकी

भव्य रक्तदान शिबीरातुन समाजकार्य .
जामखेड प्रतिनिधी

दिवसेंदिवस वाढणारे अपघात व रक्ताची आवश्यकता असणारे वाढते आजार त्यामुळे रक्ताची वाढती गरज या पार्श्वभूमीवर जामखेड मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले. या रक्तदान शिबीराद्वारे सामाजिक बांधिलकी जपली. जामखेड मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, आय लव नगर व Aimra यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ जुलै रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात एकुण ६५ रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.
जामखेड शहरातील बीड रोड कॉर्नर येथील दुर्गा मोबाईल शाॅपी शेजारील हाॅल मध्ये हा रक्तदान शिबीराचा उपक्रम संपन्न झाले. जामखेड मोबाईल रिटेल विक्रेते ,डिस्ट्रीब्यूटर ,बजाज ,टीव्हीएस फायनान्स,जिवो, वी, एअरटेल, बीएसएनएल फिल्ड ऑफिसर यांचा शिबिराच्या आयोजनात विशेष सहभाग होता.
यावेळी जामखेड मोबाईल असोसिएशनचे विजय आहुजा, सुनिल जगताप, संतोष नवलाखा,सूंदर परदेशी, बापू कुलकर्णी, देविदास गोरे,शुभम बनकर, अनिल गळगटे, मनोज आंधळे, संदिप लटके, संदिप खैरे,राज माने, करण गुलाटी, गहिनीनाथ वीर, पवन कांकरिया, श्रीकांत गोबरे,आसिफ सय्यद, वैभव भंडारी, अजय भोसले, संदेश घायतडक, सलमान शेख, सचिन डोंगरे, सतिश काळे,समीर मणियार, ऋषी लांडगे, गोविंद साठे आदि मोबाईलचे दुकानदार उपस्थित होते.
सुरभी बल्ड सेंटरचे डॉ. राजेंद्र पवार, विकास जरे ,शुभम खिल्लारी, सोनिया शितोळे, माधुरी हिवाळे, अशोक विघ्ने रक्तदान करण्यासाठी यांनी विशेष परिश्रम घेतले.

रक्ताने माणुसकीचे नवे नाते जोडणाऱ्या या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा आणि आपल्या मित्र परिवारालाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करा. असे आवाहन आयोजकांच्या वतीने जामखेड मोबाईल रिटेलर्स असोसिएशन यांनी केले होते. या अवाहनास प्रतिसाद देत ६५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन मोठा प्रतिसाद दिला.तसेच असोसिएशन च्या वतीने असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!