भुतवडा येथील चोरीचा पर्दाफाश लोखंडी रॉडने वार करत जबरी चोरी ! जामखेड मधील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या मुद्देमाल जप्त
भुतवडा येथील चोरीचा पर्दाफाश
लोखंडी रॉडने वार करत जबरी चोरी !
जामखेड मधील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
मुद्देमाल जप्त
जामखेड प्रतिनिधी
लोखंडी रॉडने मारहाण करत जबरी चोऱ्या व घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे .
यामध्ये दोन मुख्य आरोपींसह चोरीचे दागिने विकण्यास मदत करणाऱ्या दोन जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास भुतवडा (ता. जामखेड) येथील रहिवासी सुरेश जालींदर डोके (वय ३३) यांच्या घरी चार अनोळखी चोरट्यांनी बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपींनी सुरेश डोके आणि त्यांच्या आईला लोखंडी रॉडने मारहाण करून आईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व घरातील रोख रक्कम जबरीने चोरून नेली होती.
याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक तपासासाठी रवाना केले.यानंतर २६ सप्टेंबर २०२६ रोजी तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, हा गुन्हा मिलिंदनगर (जामखेड) येथील किरण गोविंद चव्हाण आणि अनिल गौतम काळे यांनी त्यांच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तत्काळ सापळा रचून किरण गोविंद चव्हाण (वय १९) आणि अनिल गौतम काळे (वय १८) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी हा गुन्हा किरण रावसाहेब काळे, रोहित अशोक काळे, कोहिनूर दीपक काळे, ओमकार फुलचंद काळे आणि करण अशोक पवार या साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. हे पाचही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच अधिक तपासादरम्यान आरोपी किरण चव्हाण याने साथीदार रोहित पवार याच्या मदतीने कृष्णा भोसले यांच्या घरी चोरी केल्याची माहिती दिली,
ज्यामुळे जामखेड पोलीसठाण्यातील घरफोडीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.
चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, सोन्याचे मंगळसूत्र विक्रीसाठी घेतल्याप्रकरणी परवेज अझहर सय्यद (वय ४१, रा. बीड रोड, जामखेड) आणि किरण उर्फ दादा शंकर काळे (वय ३०, रा. मिलिंदनगर, जामखेड) यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांनी हे मंगळसूत्र सोमनाथ झुंबर खवळे याच्याकडे ठेवल्याचे सांगितले.
तपासादरम्यान सोमनाथ खवळे याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. तसेच आरोपीतिगा नन्याच्या घरातून २० हजार रुपयेपोलिसांनी एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना मुद्द्यामालासह पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि विकास जाधव आणि पोलीस अंमलदार फुरकान शेख, शामसुंदर जाधव, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!