जामखेडच्या म्हाडा कॉलनीत २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अज्ञात;अकस्मात मृत्यूची नोंद:
RELATED ARTICLES
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भा.ना.सु.सं. २०२३ चे कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अनिकेत बेंजामिन निमगावकर (वय २९, रा. जे.पी. हाइट्स, मुनुरवार हाऊसिंग सोसायटी, वडगाव शेरी, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान म्हाडा कॉलनी, जामखेड येथे तो मृतावस्थेत आढळून आला.
त्यानुसार दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी १.१४ वाजता जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ६८/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली.मयत तरुणाचा मृत्यू कोणत्या अज्ञात कारणाने झाला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळी स.फौ. शिवाजी कदम यांनी भेट दिली असून पुढील तपास त्यांच्याकडून सुरू आहे. जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215