Homeव्हिडिओ बातम्याबिलाल शेख काम करणारा तरूण लोकांच्या चर्चेत :बिलाल शेख लोकचळवळीतला माणुस :...

बिलाल शेख काम करणारा तरूण लोकांच्या चर्चेत :बिलाल शेख लोकचळवळीतला माणुस : प्रभाग ७ मधुन लोकांचा माणुस लोकांसाठी

बिलाल शेख काम करणारा तरूण, लोकांच्या चर्चेत:

बिलाल शेख लोकचळवळीतला माणुस 

प्रभाग ७ मध्ये लोकांचा माणुस लोकांसाठी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये बिलाल रशिद शेख यांच्याबद्दल ” लोकांचे काम करणार तरूण”… “लोकांमधला माणुस”… लोकचळवळीतला माणुस ” अशी सकारात्मक चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.

आमदार रोहित (दादा) पवार यांचे समर्थक आणि सतत सक्रिय असलेले बिलाल शेख यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देणारा, निर्व्यसनी आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन असलेला तरुण म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर तसेच आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही आरोग्य शिबिर, शालेय साहित्य व खाऊ वाटप असे समाज उपयोगी उपक्रम राबविले.

स्थानिकांनी सांगितले की, लोकांमध्ये राहून काम करणारा, समस्यांवर तत्पर प्रतिसाद देणारा, प्रभागातील सर्व घटकांशी सलोखा राखणारा अशा वैशिष्ट्यांमुळे बिलाल शेख यांचे नाव प्रभागात चर्चेत आहे.

*उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व*

एम.एस.सी, बी.एड आणि एल.एल.बी. अशी त्रिविध पदवी प्राप्त केलेले बिलाल शेख हे तरुण वयातच समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी नोकरीचा मार्ग न निवडता थेट लोकसेवेचा मार्ग निवडला. निर्व्यसनी, स्वच्छ प्रतिमा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा स्वभाव यामुळे प्रभागातील प्रत्येकाशी त्यांचा घट्ट संवाद निर्माण झाला आहे.

२०१९ नंतर आमदार रोहित (दादा) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिलाल शेख यांनी जुन्या प्रभाग ९ (सध्याचा प्रभाग ७) मध्ये उल्लेखनीय विकासकामे केली. त्यांच्या पुढाकाराने एस.आर. टेलर घर ते अंदूरे गुरुजी घर, वासकर वाडा ते बाबुराव बोरकर घर, सादिक सय्यद घर ते आकसा मस्जिद, बांदल घर ते भोसले जुनी गिरणी या अनेक सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाली. नगरसेवक नसतानाही इतकी कामे पूर्ण केल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.

*जनतेच्या अडचणींना तत्पर प्रतिसाद*

दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासल्यावर शेख यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. कोविड काळात त्यांनी किराणा किट वाटप, आरोग्य शिबिरे आणि दवाखाना आपल्या दारी या उपक्रमांतून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली.

*बिलाल शेख यांचा राजकीय प्रवास आणि निष्ठा*

२०१३ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले बिलाल शेख हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधून कार्यास सुरुवात केली. आमदार रोहित पवारांचे कट्टर समर्थक व विश्वासू आणि तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

*जनतेचा कौल – बदलासाठी*

प्रभाग ७ मधील नागरिक बिलाल शेख यांना आपला नगरसेवक म्हणून पाहण्यास उत्सुक आहेत. जनतेचा नगरसेवक ही ओळख त्यांनी आधीच कमावली असून, लोकांचा कौल आता त्यांच्या बाजूने एकवटला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित झाल्यास बिलाल शेख यांची उमेदवारी या निवडणुकीत प्रबळ ठरणार असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!