Homeव्हिडिओ बातम्यापक्ष निष्ठेच्या व लोकांच्या विश्वासाच्या जोरावर प्रा राजेंद्र पवार निवडणूक रिंगणात जिल्हा...

पक्ष निष्ठेच्या व लोकांच्या विश्वासाच्या जोरावर प्रा राजेंद्र पवार निवडणूक रिंगणात जिल्हा परिषद साकत गटातुन करणार उमेदवारी

पक्षाशी एकनिष्ठेतेच्या व लोकांच्या विश्वासाच्या जोरावर प्रा राजेद पवार निवडणूक रिंगणात

आ रोहित पवार यांनी संधी दिली तर साकत जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करणार

जामखेड प्रतिनिधी

प्रा. राजेंद्र साहेबराव पवार हे एक संवेदनशील, लोकहितवादी विचाराचे व्यक्तिमत्व आहे लोकांच्या विश्वासाच्या जोरावर येणारया जिल्हा परिषद निवडणुकीत जामखेड तालुक्यातील साकत जिल्हा परिषद गटातून निवडणूकीच्या रींगणानात उतरणार आहेत. प्रा राजेंद्र पवार शैक्षणिक क्षेत्रात राहुनही जनतेच्या अडिअचणीत मदत करत जनसंपर्क वाढवत राहिले. आज मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्काच्या व सामाजीक कामाच्या व पक्षाशी एकनिष्ठ, प्रणाणिकतेच्या जोरावर साकत जिल्हा परिषद गटातुन उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत.
त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक साहेबराव पवार यांचा कार्यकाळ समाजाच्या हिताचा राहिला आहे.वडीलांच्या जनहित विचाराचा मोठा वारसा आपल्या कामातून राजेंद्र पवार यांनी जपला आहे. साहेबराव पवार १९५७-१९६२ काळात जिल्हा स्कुल बोर्ड (तत्कालिन जिल्हा परिषद )चे अध्यक्ष राहिले. पूढे १९६२ ला स्थानिक स्वराज्य संस्थां अस्तित्वात आल्यानंतर १९६२ साली जामखेड पंचायत समितीचे सभापती राहिले. १९६२-७८ पर्यंत जिल्हा परिषद मध्ये काम केले. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून १५ वर्ष काम पाहिले. दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेचे अध्यक्ष होण्याचा मान मिळविला. राज्यसहकारी बँकेचे प्रतिनिधीत्व केले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिले. त्यांच्या कार्यकाळात बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ झाला , तसेच पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अनेक वर्षे अध्यक्ष असतांना तालुक्यात सिनिअर काँलेज, साकत, राजुरी, हळगाव येथे हायस्कूल करून शिक्षणाची सोय केली. पाडळीचे हायस्कूल, जुनिअर कॉलेज, काढले. कर्जतच्या दादापाटील महाविद्यालयाच्या उभारणीत सिंहाचा वाटा राहिला. त्यामुळे बहूजन समाजाच्या मूलांच्या शिक्षणाची सोय झाली. जिल्हातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, बापुराव तनपूरे, शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, भाऊसाहेब थोरात, मारूतराव घूले, बी जे खताळ या समविचारी व्यक्तिमत्वाबरोबर काम करत लोकहितासाठी साहेबराव पवार यांनी आपले आयूष्य वेचले. आज वडीलांच्याच विचाराने राजेंद पवार राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. आ रोहित पवार यांचा कर्जत जामखेड मतदारसंघात प्रवेश झाल्यापासून त्यांच्याबरोबर काम करत आहे. विविध निवडणुकांमध्ये पक्षाचे प्रमाणिक काम करत मताधिक्य वाढविण्याचे काम केले. आपल्या कामातून राजेंद्र पवार यांनी जनतेशी सुसंवाद करत मोठा लोकसंपर्क वाढला आहे. काम करत आहेत यातुन जनतेचा विश्वास संपादन केला आहे याच विश्वासाच्या जोरावर प्रा राजेद पवार जिल्हा परिषद साकत गटातुन आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीला सामोरे जाण्यास इच्छुक आहेत.आ. रोहित पवार यांनी संधी दिली तर साकत जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकास काम,, शेतकरी व सामान्य माणसांचे काम आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीन असे प्रा राजेंद्र पवार यांनी सांगितले. 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

प्रा

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!