बाबा ,अष्टगंध लावा म्हणत वृद्धाला २५ हजाराला लावला चुना .वृद्ध शेतकऱ्याला गप्पा मारत लूटले .खर्डा बसस्थानकातील घटना
वृध्द शेतकऱ्याला गप्पा मारत लुटले
जामखेड प्रतिनिधी
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील वाकी येथील नाना सिताराम धावडे (वय ६७) हे पत्नीसोबत शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. गुरुवारी ते खर्डा येथे आठवडी बाजारासाठी आले होते. बाजारातील खरेदी आटोपल्यानंतर दुपारी सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान ते गावाकडे जाण्यासाठी खर्डा बसस्थानकावर एसटीची वाट पहात उभे होते.याचवेळी एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला. “बाबा, देवाचा अष्टगंध लावा,” असे सांगत त्याने धावडे यांना अष्टगंध लावण्याचा आग्रह केला.
बसस्थानकावर गर्दी असल्याचे सांगून त्याने त्यांना जवळच असलेल्या झाडाजवळ नेले. तेथे अष्टगंध लावल्यानंतर “मला लातूरला जायचे आहे, बस कुठे लागते?” अशी विचारणा करत त्याने धावडे यांच्याशी संवाद सुरू ठेवला.
काही वेळाने त्यांचा पुतण्या दिनेश रावसाहेब धावडे बसस्थानकाजवळ भेटला. त्याला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार खर्डा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
या घटनेत पाच हजार रुपये रोख, दोन ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम आणि दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील काड्या असा एकूण सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तसेच आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिस करत आहेत.
RELATED ARTICLES





प्रतिनिधी यासीन शेख 9423391215