Homeव्हिडिओ बातम्याझुरळांनी आणले सरकारला नाके नऊ .आंदोलनाला आवर घालतांना सरकारची दंडेलशाही ?

झुरळांनी आणले सरकारला नाके नऊ .आंदोलनाला आवर घालतांना सरकारची दंडेलशाही ?

झुरळांनी आणले सरकारला नाकीनऊ

आंदोलनाला आवर घालतांना
सरकारची दंडेलशाही ??

जामखेड प्रतिनिधी

मोदी सरकारने १२ वर्षांच्या कार्यकाळात एकही मोठे अंदोलन होऊ दिले नाही. विशेष म्हणजे एकही पत्रकार परिषद घेतली नाही . देशवासीयांची इच्छा असो किंवा नसो देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना जेव्हा वाटले तेव्हा मनातले बोलले . “मन की बात”च्या माध्यमातून जनतेला ऐकवले. यावरच एक तप मोदी सरकारने काढले.मात्र न्यायालयाने “झूरळं” म्हटलेल्या तरूण -तरुणींनी सरकारला नाकीनऊ आणले आहे .पण गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाने देशातील बेरोजगार तरूणांना “झुरळ” म्हणले आणि तीन महिन्यांत सर्व झुरळांनी एकत्र येऊन मोदी सरकारच्या नाकीनऊ आणले.

शेतकरी संघटनांपासून विरोधी पक्षांपर्यंत अनेकांनी दिल्लीत आंदोलन करून केंद्र सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले. मात्र, नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच आंदोलक थेट संसदेवर धडकले. संसद भवनाकडे जाणारे महत्त्वाचे रस्ते तरुण-तरुणींनी व्यापून टाकल्याने पोलीस व निमलष्करी दल आंदोलकांना आवर घालतांना हतबल झाल्याचे पाहायला मिळाले . आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना वारंवार अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तरीही, आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. मोदी सरकारच्या १२ वर्षांत पहिल्यांदाच संसद भवन परिसरातील आंदोलनावेळी सुरक्षा व्यवस्था निर्णायकी दिसत होती. यापूर्वी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते, मात्र ते दिल्लीच्या वेशीबाहेर होते. या मोठ्या आंदोलनापूर्वी २०१९ मध्ये जंतरमंतरवर शेतकरी संघटनांनी दोन दिवस आंदोलन केले होते. मात्र कोणतेही आंदोलन इतके हिंसक झालेले नव्हते. संसदेकडे पोहोचणाऱ्या संसद मार्गासह विविध मार्ग काही कीलो मीटर पर्यंत आंदोलकांनी भरून गेले होते. संसदेच्या समोरील चौकाला लागूनच सरकारी मंत्रालये असलेले शास्त्री भवन, कृषि भवन आहे. त्याच्यासमोरच रेल भवन असून त्यापलीकडे बहुचर्चित कर्तव्यपथही आहे. हा सगळा परिसर तरुण आंदोलकांनी घोषणाबाजी करून दणाणून टाकला होता. सरकारने पोलीसांसह विविध सूरक्षा फोर्स तैनात करत आंदोलक विद्यार्थी यांनी आवरण्याचा दंडेलशाहीतून जेवढा प्रयत्न केला तेवढ्या धाडसाने हिम्मतीने या विद्यार्थ्यांनी ( न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ) झुरळांनी सरकारच्या नाकी नऊ आणलेले पहायला मिळाले .प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!