Homeव्हिडिओ बातम्याबनावट नवरी आणि तिचा बनावट मावस भाऊ अटक :खोटे लग्न रचून लाखो...

बनावट नवरी आणि तिचा बनावट मावस भाऊ अटक :खोटे लग्न रचून लाखो रुपयांचा गंडा

बनावट नवरी आणि तिचा बनावट मावस भाऊ अटक

खोटे लग्न रचुन लाखों रूपयांना चुना

जामखेड प्रतिनिधी

अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सर्वत्र सक्रिय आहेत. खोटा विवाह रचून पैसे घेणारी बनावट नवरी आणि तिचा बनावट मावस भाऊ अशी दोन आरोपींना अटक करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे अनेक तरुणांची संभाव्य फसवणूक टळली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील रोहित रमेश तरटे (वय २८) या हॉटेल व्यवसायिक तरुणाची या टोळीने फसवणूक केली होती. १३ डिसेंबर २०२४ रोजी घोगरगाव व १४ डिसेंबर रोजी आळंदी (पुणे) येथील रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयात लग्नाचे नाटक रचून त्याच्याकडून तीन लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर बनावट नवरीने काही दिवस त्याच्या घरी वास्तव्यास राहत घरातील रोख रक्कम चोरली आणि पसार झाली.या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३१८(४), ३०३ (२), ३(५) अंतर्गत ११ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने बुलढाणा, जालना व संभाजीनगर परिसरात शोध मोहीम राबवली. यावेळी नवरीचा बनावट रोल करणारी एक महिला आणि मावस भावाचा रोल करणारा आकाश तोताराम सुरोशे (वय ३१, रा. दहिद बु. ता. जि. बुलढाणा) या दोघांना अटक करण्यात आली.अटक केलेल्या आरोपींना १३ जुलै रोजी श्रीगोंदा कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी आणखी कोठे खोटे विवाह केले असतील किंवा अन्य कोणी फसवणूक झाल्यास त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात राजस्थानमधील धम्बोला पोलीस ठाण्यात देखील भा.दं.वि. कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल आहे, अशी माहिती समोर आली आहे.

ही धडक कारवाई पोली अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय अधिकारी गणेश उगले, तसेच श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शोध पथकातील पोकॉ. संदीप आजबे, पो.ना. संग्राम जाधव, पोकॉ. संदीप शिरसाठ, पोकॉ. रवि जाधव, पोकॉ. संदीप राऊत, पोकॉ. अरुण पवार, , पोकॉ. मयुर तोरडमल, मपोकॉ. अलका वाघ, तसेच सायबर सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु व पो.कॉ. नितीन शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पो.हे.कॉ. भांडवलकर व पो.कॉ. फारुख मण्यार करत आहेत.अशा बनावट लग्न लावणारया लोकांपासून सावध राहा तसेच संशय आल्यास पोलीसांना संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!