Homeव्हिडिओ बातम्याप्रा कुंडल राळेभात व अनूराधा अडाले यांच्या प्रचारार्थ भव्य रँली, आमदार रोहित...

प्रा कुंडल राळेभात व अनूराधा अडाले यांच्या प्रचारार्थ भव्य रँली, आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार शुभारंभ, प्रभाग क्रमांक सात मध्ये कूंडल राळेभात व अनुराधा अडाले यांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

 

  प्रा.प्रदीप उर्फ कुंडल राळेभात आणि अनुराधा अडाले यांच्या प्रचारार्थ भव्य मिरवणूक

आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग ७ मध्ये  प्रचाराचा शुभारंभ

कुंडल राळेभात व अनुराधा अडाले यांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

 जामखेड प्रतिनिधी:

जामखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने दि. २२ नोव्हेंबर रोजी प्रचाराचा भव्य शुभारंभ आमदार रोहित (दादा) पवार यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये करण्यात आला.

शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता सुरू झालेल्या या प्रचार मिरवणुकीचा धर्म योध्दा चौकातुन शुभारंभ करण्यात आला. पुढे संत कान्होपात्रा मंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तैलचित्रास अभिवादन, बौद्ध विहार मार्गे मिरवणूक

तपनेश्वर येथील महादेव मंदिरापर्यंत आली. महादेव मंदिरात नारळ फोडून प्रचार मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. यावेळी धार्मिक सौहार्द आणि सामाजिक एकतेचे अनोखे दर्शन घडले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या शहाजी राळेभात तसेच शिवसेना (उबाठा) गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रा.प्रदीप उर्फ कुंडल राळेभात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार अनुराधा अडाले यांच्या प्रचारार्थ ही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती . हलगीच्या नादात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजीच्या गजरात मिरवणुकीने परिसर दणाणून गेला.

या प्रचारात शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख ॲड. मयुर डोके,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले,सचिन शिंदे,माजी सरपंच संजय भोसले,इस्माईल सय्यद, संदीप अडाले,ॲड. हर्षल डोके,बिलाल शेख, गणेश हगवणे,दादा महाडिक, मनोज कार्ले,सचिन शिंदे,दिपक घायतडक, संतोष डूचे,अजय भोसले, बालाजी भोसले, विशाल नेटके आदी शेकडो कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!