प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी (शप) काँग्रेचा प्रचार शुभारंभ मंदिर–दर्ग्यातून आशिर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार संध्या राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे आणि नगरसेविका प्रा.हिना सय्यद यांच्या प्रचारार्थ भव्य रँली मिरवणूक
प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी (शप) काँग्रेचा प्रचार शुभारंभ
मंदिर–दर्ग्यातून आशिर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात
नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार संध्या राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे आणि नगरसेविका प्रा.हिना सय्यद यांच्या प्रचारार्थ भव्य रँली मिरवणूक
जामखेड प्रतिनिधी:
जामखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) काँग्रेसच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतमध्ये करण्यात आला.यावेळी भव्य रँलीचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता सुरू झालेल्या या प्रचार मिरवणुकीची सुरुवात शांतीनाथ आश्रम, नगर रोड जामखेड येथे नारळ फोडून करण्यात आली. त्यानंतर तपनेश्वर रोडवरील श्री हनुमान मंदिरातही नारळ फोडून विजयी अभियानास शुभारंभ करण्यात आला.
प्रचाराचा समारोप शहरातील हजरत इमाम शहा वली दर्गाह येथे चादर चढवून आशिर्वाद घेत करण्यात आला. यावेळी धार्मिक सौहार्द आणि सामाजिक एकतेचे अनोखे दर्शन घडले.
नगराध्यक्ष पदासाठी सौ. संध्या शहाजी राळेभात, नगरसेवक पदासाठी राजेंद्र आजिनाथ गोरे, तर नगरसेविका पदासाठी प्रा. हिना इस्माईल सय्यद यांच्या प्रचारार्थ ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या नादात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजीच्या गजरात मिरवणुकीने परिसर दणाणून गेला.
या प्रचारात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.संध्या शहाजी राळेभात, नगरसेवक राजेंद्र आजिनाथ गोरे,नगरसेविका प्रा.हिना इस्माईल सय्यद,वसिम युसुफ शेख, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, लक्ष्मण गोरे, इस्माईल शेख,ज्येष्ठ नेते रघुनाथ पोकळे, इस्माईल सय्यद,वैजिनाथ पोले, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. मयुर डोके, ॲड. हर्षल डोके, लक्ष्मण गोरे, गणेश हगवणे, वसीम युसुफ शेख, सचिन शिंदे, इस्माईल शेख, अश्पाक शेख, फिरोज शेख, नईम फिटर, जुबेर शेख, सोहेल सय्यद, साहिल सय्यद, साद सय्यद, सादाब शेख, रोहित पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!