Homeव्हिडिओ बातम्यापै चिराग मंगेश आजबे यांच्या गावभेट दौरयात जनतेचा वाढता प्रतिसाद :वडीलांप्रमाणेच शेतकरयांच्या...
पै चिराग मंगेश आजबे यांच्या गावभेट दौरयात जनतेचा वाढता प्रतिसाद :वडीलांप्रमाणेच शेतकरयांच्या हितासाठी काम करणार – पै चिराग आजबे
पै. चिराग मंगेश आजबेंच्या गाव भेट दौरयात मोठा वाढता प्रतिसाद
सामाजिक कार्याचा ग्रामस्थांनी केला गुण गौरव.
वडीलांनी घालुन दिलेला सामाजिक वारसा जपत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करणार : पै. चिराग आजबे.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून संबोधले जाणारे मंगेश आजबे व साकत जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार पै. चिराग आजबे यांची खांडवी येथे गाव भेट व घोंगडी बैठक संपन्न झाली यावेळी ग्रामस्थांनी मंगेश दादा यांनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली आंदोलन आणि त्या माध्यमातुन कसा न्याय मिळाला याबाबत चर्चा झाली तसेच सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी दादा नेहमी कशी मदत करतात त्यामुळे अशा कार्यक्षम नेतृत्वाला आपण संधी दिली तर आपल्या आडचणी सोडवण्यासाठी त्यांना आणखी बळ मिळाले आशा भावना ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केल्या
आणी हाच संदर्भ देत पै. चिराग आजबे म्हणाले की आज मी निवडणूकीच्या निमीत्ताने वडीलांन सोबत गावागावात जातो आहे आणी याच दरम्यान त्यांनी केलेले कार्य वडीलधारी मंडळी सांगतात यामुळे त्यांचा सर्व सामान्यांशी आसलेला संपर्क आणी माझ्या
वडीलांबद्दल आसलेला आपलेपणा याचा मला सार्थ अभिमान आहे त्यांच्याच कार्यपद्धती मीही भविष्यात आपली सेवा करीत राहील असे बोलताना पै. चिराग आजबे यांनी सांगितले
समारोपाच्या भाषणात बोलताना मंगेशदादा आजबे म्हणाले की शेतकरी हा आपला धर्म कोण कोणत्या पक्षाचा गटाचा आसा भेदभाव मी कधी केला नाही आणि तुमच्या पाठिंब्याच्या आधारावरच मी आनेक आंदोलने केली आणी ती यशस्वी करून दाखवली यातुनच आज तुम्ही माझं जे स्वागत केलं आणि प्रतिसाद दिला त्याने माझा ऊर भरून आला आसचं प्रेम व आशिर्वाद राहु ही आपेक्षा व्यक करतो आशी भावना व्यक्त केलीगावकऱ्यांनी वाजत गाजत मंगेशदादा आजबे व पै. चिराग आजबे यांचे स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने खांडवी ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने मंगेश (दादा) आजबे व पै चिराग आजबे यांचा सन्मान करण्यात आला
मंगेश (दादा) आजबे हे आपल्या मुलासाठी निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी अत्तापर्यंत झिक्रि, राजेवाडी, सावरगाव व धोंडपारगाव, खांडवी येथे गावभेटी दौरै सुरू केले आहेत. त्यांच्या या दौऱ्याला आज धोंडपारगाव येथिल ग्रामस्थांनी प्रचंड असा मोठा प्रतिसाद दिला. त्या बद्दल पै. चिराग आजबे व मंगेश आजबे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी धोंडपारगाव येथील शाळा व अंगणवाडी येथिल चिमुकल्यांना चिराग आजबे यांच्या कडुन खाऊ वाटप केला. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता
error: Content is protected !!