Homeव्हिडिओ बातम्यापद नसताना विकासकामं केली :जनतेच्या मनात एकच नाव रमेश आजबे:अश्विनी रमेश आजबे...

पद नसताना विकासकामं केली :जनतेच्या मनात एकच नाव रमेश आजबे:अश्विनी रमेश आजबे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी:जनतेची मागणी

 

पद नसतांना विकास कामं केली

जनतेच्या मनात एकच नाव रमेश आजबे

अश्विनी रमेश आजबे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी
जामखेड प्रतिनिधी

कुठलंही राजकीय पद नसताना जनतेसाठी प्रामाणिक पणाने स्वखर्चातून कोट्यवधींचे काम करणारे जामखेड मध्ये एकमेव नागरिकांच्या चर्चेतलं नाव म्हणजे रमेश आजबे होय.
मागच्या दहा वर्षापासून ही व्यक्ती काम करत आहे मग नगरपरिषद जामखेड मधून जर अश्विनी रमेश आजबे यांना एक संधी मिळाली तर त्या संधीच सोन हा माणूस निश्चित करू शकतो जामखेडच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते असे शहरात नागरिकांमधून  बोललं जात आहे. याच बळावर रमेश आजबे आपल्या सौभाग्यवती अश्विनी रमेश आजबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत.

सामाजिक कामाचा विचार करता कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक सामाजिक कामे मार्गी लावणारे एकच नाव जामखेड करांच्या मुखात आहे ते म्हणजे रमेश आजबे. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी त्याच्या सौभाग्यवती अश्विनी रमेश आजबे यांना सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे.

रमेश दादा आजबे यांनी जामखेड शहरांमध्ये स्वखर्चातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावलेली आहेत. तसेच ते आमदार रोहित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करतात. मागील दहा वर्षांपासून त्यांनी कोवीड काळात रूग्णांना दिलासा देत मोठ्या प्रमाणावर समाजसेवाक केली, शहरातील विविध प्रभागात वृक्षारोपण, मुरमीकरण, बाकडे, लाईट सुविधा, स्वच्छता अभियान, कचरा कुंडी वाटप, शहरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम, शिबीरे, बंद पडलेले रस्ते सुरू करणे असे कितीतरी कामे कोट्यवधी रुपये पदरमोड करून मार्गी लावलेली आहेत. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार अश्विनी
रमेश आजबे आहेत. कोणतेही पद नसताना कोट्यवधी रुपये खर्च करून विविध सामाजिक विकास कामे मार्गी लावली जर पद मिळाले तर निश्चितच आजबे शहराचा चेहरामोहरा बदलतील अशीच चर्चा जामखेड शहरात आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी आजपर्यंत मंदिर जिर्णोद्धार, रंगकाम, वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांची सोय, गटारे बांधकाम, अनेक ठिकाणी लाईटची सोय, महाशिवरात्रीला शंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भावीक भक्तांसाठी फराळाची सोय, अनेक शिवरस्ते, अनेक ठिकाणी वृक्षारोपण, झाडांना संरक्षक जाळी, उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा, अनेक शाळांना होम थिएटर, कबड्डी, क्रिकेट टीमसाठी कीटचे वाटप, कोरोना काळात अनेकांना मास्क, सॅनिटाजर, किराणा कीटचे वाटप, भारतीय संविधान दिनानिमित्त स्नेह भोजन, मकरसंक्रांत निमित्त विविध कार्यक्रम, रक्षाबंधन निमित्त झाडांना राखी बांधणे, भक्ती शक्ती महोत्सवात मंडप व लाईटची व्यवस्था करण्यात येते.

शहरात दुकानदारांना डस्टबिन वाटप, स्वच्छता अभियान लोकचळवळ बनविली हरित जामखेड साठी अनेक ठिकाणी वृक्षारोपण व त्यांचे संगोपन केले, रमजान ईदमध्ये मुस्लिम बांधवांना फळे वाटप, अनेक ठिकाणी शाळांना मदत सारोळा येथे शाळेस गेट बसवून दिले, बीड रोड ते ल. ना. होशिंग विद्यालयास जोडणारा तीस वर्षांपासून चा बंद रस्ता चालू करून पेव्हिंग ब्लॉक बसवले लाईटची सोय केली ग्रामीण रुग्णालय बोअरवेल घेऊन मोटार बसवून दिली लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय केली या सह अनेक अशी सामाजिक कामे मार्गी लावली. यासाठी आमदार रोहित पवार हेही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करतात.

कोट्यावधी रूपयांची पदरमोड करून खरे सामाजिक काम करणारा सच्चा समाजसेवक म्हणून रमेश (दादा) आजबे यांची ओळख आहे. शहरासह परिसरात कोणाला काही अडचण आली तर लोक हक्काने रमेश आजबे यांना सांगतात आणि त्यांच्या कडून ती अडचण सुटतेच असे नागरिकांचे मत आहे. अनेक वर्षांपासून ते संविधान दिन व आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त येणाऱ्या सर्व लोकांची जेवन व पाण्याची सोय करतात. तसेच महाशिवरात्रीनिमित्त फराळाची सोय करतात.

सामाजिक कामाचा विचार करता कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक सामाजिक कामे मार्गी लावणारे एकच नाव जामखेड करांच्या मुखात आहे ते म्हणजे रमेश आजबे. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी त्याच्या सौभाग्यवती अश्विनी रमेश आजबे यांना सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. कुठलाही राजकीय पद नसताना जनतेसाठी प्रामाणिक पणाने मागच्या दहा वर्षापासून ही व्यक्ती काम करत आहे मग नगरपरिषद जामखेड मधून जर एक संधी मिळाली तर त्या संधीच सोन हा माणूस निश्चित करू शकतो. जामखेडच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते असेच आमच्याकडे शहरात बोललं जात आहे. रमेश आजबे हे सर्वाना बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!