तंटामुक्त शहर, सलोख्याचा वारसा जपणारं शहर,
हाताला काम देणारं शहर करणार – प्रा मधुकर राळेभात ,
सुनिता मधुकर राळेभात नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार : भाजपकडे उमेदवारी मागणार :- प्रा मधुकर राळेभात
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणूक २०२५ नूकतीच जाहीर झाली आहे.
सुनिता मधुकर राळेभात या जामखेड नगराध्यक्षपदाच्या इच्छूक उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाकडे यांच्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागणार आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर जनतेच्या मनातलं शहर, तंटामुक्त शहर, हाताला काम देणारं शहर, सामाजिक सांस्कृतिक वारसा जपणारं शहर असं जामखेड करण्यासाठी काम करणार.
पक्षानं उमेदवारी नाही दिली तर प्रमाणिकपणे जो उमेदवार देतील त्याचे काम करणार असे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दि ६ नोव्हेंबर रोजी भाजपाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांनी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या मागणी अनुशंगाने पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी नगरसेवक दिगंबर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव ढेपे, पवन राळेभात, अमित जाधव, भाजपा व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष निलेश उर्फ पिंटूशेठ बोरा, गणेश राळेभात, उद्धवराव हुलगुंडे, अशोक गायकवाड, राजू वारे, अँड अमृत राळेभात, विलास मोरे, वैभव काटकर, सुरज राळेभात, लखन राळेभात आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मधुकर राळेभात म्हणाले की सध्या नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांची मोठी जाहिरातबाजी चालू आहे. आम्ही भावनिक उतावळे होणार नाहीत. जामखेड हे २५ वर्षांपुर्वी सुधारित खेडे होते. मात्र सध्या नगरपरिषद असुनही ग्रामपंचायत बरि होती हे नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. विकासाला खिळ बसली असुन भकास जामखेड झाले आहे.
अनेक जाती धर्म पंथांनी भरलेले सामाजिक सलोख्याचे जामखेड शहराची सध्या गुंडाचे घर अशी प्रतिमा झाली आहे. ही प्रतिमा पुसण्याचे व तंटामुक्त जामखेड शहर करण्याचं काम करायचे आहे. आज जामखेडला सर्व घटकातील व्यवसायिकांसाठी व्यावसायिक माँल असणे आवश्यक आहे. महिलांना रोजगार देणारे बचत गटांचे माँल झाले पाहिजे.
माझीही पत्नी बीपीएड आहे. सामाजिक राजकीय विषयांची चांगली माहिती आहे. सुशिक्षित आहे. मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे पक्षाने दिली संधी तर त्याच सोन करिन, सभापती प्रा राम शिंदे यांच्यामुळे कोणत्याही विभागातून शहरातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. त्यासाठी पाठपुरावा करू. त्यामुळे विकास आता दूर नाही आपण सर्व जण मिळून जामखेड शहर स्वछ सुंदर हरित शहर बरोबरच तंटामुक्त शहर, हाताला काम देणारं शहर सांस्कृतिक वारसा जपणारं शहर असे जामखेड शहर करू असे प्रा मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प
प्रतिनि यासीन शेख 9423391215 धी
