दोन दिग्गजांच्या भांडणात विकासाचा श्वास गुदमरला
तिसरी आघाडी करणार जामखेडच्या विकासाचा श्वास मोकळा
जैनब वाहेद कूरैशी यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे दिग्गजांनी घेतला धसका,
तिसऱ्या आघाडीचे नगरसेवक उमेदवारामुळे निवडणुकीत रंगत
जामखेड प्रतिनिधी
जातीच्या मतांची बेरीज करून दोन्ही आमदारांनी उमेदवार दिले आहेत. अनेक वर्षांपासून आम्ही राजकीय सामाजिक काम करत आहे. आमचा मतदारांवर विश्वास आहे. यूवा नेतृत्व वसीम भाई बिल्डर कूरैशी यांची आई जैनब वाहेद कूरैशी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून तिसरी आघाडी सत्ताधारी व प्रस्थापितांविरुद्धच्या व जामखेड विकासाच्या लढाईत जिंकणार आहे जनतेवर आमचा विश्वास आहे. दोन आमदारांच्या भांडणात जामखेडच्या विकासाचा श्वास गुदमरला आहे. अनेक कामे रखडली आहेत. यामुळे जामखेड तो तिसरी आघाडी जामखेडच्या विकासाचा श्वास मोकळा करणार आहे. असे तिसर्या आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जामखेड नगरपरिषद निवडणूकीत
वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शेकाप यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. नगरपरिषद निवडणुक संदर्भात तिसऱ्या आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव, काँग्रेसचे राहुल उगले, वसीमभाई बिल्डर कुरैशी हाजी अस्लम शेख, अरविंद जाधव,, अन्सार पठाण, मुन्तजर सय्यद, मुनाफ सय्यद मूजाहीद आत्तार आरिफ सय्यद मुज्जु पठाण अरविंद जाधव
यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष पदाचे तिसऱ्या आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जैनब वाहेद कुरैशी, प्रभाग सहा साठी दोन वंचित बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव व संगिता भालेराव तसेच प्रभाग ५ चे काँग्रेस अधिकृत उमेदवार शितल शेलार व पुरस्कृत भारत पवार, प्रभाग८ चे प्रभाग काँग्रेसचे राहुल उगले असे उमेदवार आहेत.
. जामखेडच्या विकासासाठी तसेच आरोग्य, शिक्षण, या मुलभूत प्रश्नांवर तिसरी आघाडी जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मैदानात उतरली आहे. तिसरया आघाडीमुळे जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे.
यावेळी बोलताना अँड. डॉ. अरूण जाधव म्हणाले की, या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागणार आहेत. आम्ही संविधान मानणारे आम्ही एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे. निश्चितच चांगले यश मिळणार आहे. आम्ही सर्व सामाजिक काम करणारे एकत्र येऊन जामखेडच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. विकासासाठी आम्ही पाठपुरावा करू असे सांगितले यावेळी राहुल उगले, मुन्तजर सय्यद, अन्सार पठाण यांनीही आपले मत व्यक्त केले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
