Homeव्हिडिओ बातम्याथांबायला कुणी तयार नाही! बेशिस्त वाहनचालक ;बेफीर नागरिक. जामखेड शहरातील ट्राफिक जाम

थांबायला कुणी तयार नाही! बेशिस्त वाहनचालक ;बेफीर नागरिक. जामखेड शहरातील ट्राफिक जाम

थांबायला कुणी तयार नाही
बेशिस्त वाहनचालक; बेफीर नागरिक

जामखेड शहरातील ट्राफिक जाम

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात सध्या विविध वहातुक वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.रस्त्यावर अस्ताव्यस्त उभे केलेले वाहनं. वाहन चालकांचा बेशिस्तपणा तितकाच नागरिकांचा बेफिकीर पणा जवाबदार आहे. बाजारदिवशी वाहतुक जाम होणे स्वाभाविक आहे मात्र आता रोजच वाहतुक जाम होत असुन बस स्थानकापासुन करमाळा रोड चौफुला तसेच बीड रोड मार्केट यार्डपर्यत जाण्यासाठी एक आर्धा तास लागत आहे. मोटारसायकलस्वार छोटी चारचाकी वाहने पायी चालणारे नागरिक सगळेच फक्त घुसण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. थांबायला कुणीच तयार नाहीत.

रस्त्याच्या कडेला उभ्या गाड्यांचा बेशिस्तपणा :
दंडात्मक कारवाई करा:

जामखेड शहरातील ट्राफिक जाम ही रोजचीच गंभीर समस्या बनली आहे. वाहनांच्या वाढत्या रहदारी बरोबर शहरातील बेशिस्त वाहन चालक व रस्त्याच्या कडेला असलेल्या दूकादारांचा निष्काळजी व बेजबाबदारपणा तितकाच कारणीभूत आहे.

बीड कार्नर,खर्डा चौक परिसर ,एसटी डेपो,बालाजी वडापाव, पंचायत समिती समोर,पुढारी वड हाँटेल, जिल्हा सहकारी बँक, बसस्थानक परिसर, स्टेट बँक, किनारा हाँटेल तसेच चौकातुन पूढे खर्डा रोडवर डॉ कुडके हाँस्पीटल, उमर खय्याम हाँटेल, मोरया  हाँस्पीटल, शाही हैद्राबादी हाँटेल, या पट्टय़ात
दूचाकी चारचाकी वाहनं रस्त्याच्या दोन्ही बाजूला अर्धे डांबरीवर व अर्धे खाली असे बेशिस्तपणे दूकानासमोर उभे करून निघून जातात या बेशिस वाहनामूळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो हे पाहुनही संबधीत दूकादार काहीही बोलत नाहीत येणारी जाणारी वाहनांना शहरातून रस्ता पार करतांना अडथळा निर्माण होऊन दोन्ही बाजूने वाहनांची तासन्‌स
रांगा लागुन वहातूक जाम होते.

खर्डा चौकातील ट्राफिक सुरळीत करण्यात ट्राफिक पोलिस व्यस्त दिसतात मात्र वरिल पट्ट्यात रस्त्यावरील दोन्ही बाजुला वाहन उभी राहु दिली नाही तर मोठ्या प्रमाणावर वहातूक सूरळीत होऊ शकते.
रस्त्याच्या कडेला असलेल्या दूकानदारांचा दूकानाबाहेर हावरटपणाने वाढवलेला पसारा, दुकानांचे रस्त्यावर लावलेले फलक वाहतूकीला अढथळा ठरत आहे बेशिस्तपणे वागणारे दूचाकी, चारचाकी वाले शहरासह तालुक्यातीलच आहेत.राजकीय पक्षांचे आजीमाजी पदाधिकारी, तथाकथित समाजसेवक, दादागिरी, गुंडगिरी करणारे बेशिस्त वाहनांवर कारवाई करत आसतांना लगेच वर कोणालातरी फोन लावतात त्यामुळे इच्छा असुनही पोलिसांना काम करता येत नाही. असे ट्राफिक पोलीसांनी सांगितले
दूकानदारांना व बेशिस्त वाहनधारकांना यापूर्वी अनेक वेळा लेखी तोंडी समज दिली गेली आहे आता शिस्त लावण्यासाठी पोलिस अधिकारयांनी दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!