Homeव्हिडिओ बातम्यातालूक्यात पुरस्थिती बिकटच : पाऊस चालूच:मोहरी तलावाला भगदाड :गावातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी जाणे...

तालूक्यात पुरस्थिती बिकटच : पाऊस चालूच:मोहरी तलावाला भगदाड :गावातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी जाणे अवश्यक :कवडगाव गिरवली आगी जवळा देवकरवस्ती गावातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी जावे

तालुक्यात पुरस्थिती अद्याप बिकटच
पाऊस चालूच..
मोहरी तलावाला भगदाड पडले.
तसेच
कवडगाव,गिरवली,देवकरवस्ती,आगी,जवळा या गावातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी जावे.
जामखेड प्रतिनिधी


जामखेड तालुक्यात जवळा, चौंडी, दिघोळ, माळेवाडी, जातेगाव आदी गावात पुर परस्थिती अद्याप बिकटच आहे.
मोहरी तलाव क्षमतेपेक्षा जास्त भरला गेला असुन परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. मोहरी सांडव्यातुन ८ते १० हजार क्यूसेस वेगाने पाणी वाहत आहे. नूकतेच आलेल्या वृत्तानुसार मोहरी तलावाच्या सांडव्यावरून वेगाने पाणी वहात आहे. खडकाळ भागाला मोठे भगदाड पडले आहे. रात्रीच्या वेळी पाऊस झाला तर पाणी पातळी वाढुन परस्थिती बिकट होऊ शकते. मोहरी तलाव फुटण्याची शक्यता आहे ,मोहरी तलावाच्या खालच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी सतर्क राहात सुरक्षितस्थळी जाण्याची गरज आहे.
दूसरी कडे जवळा भागात सीना नदीचे १०० मीटर पात्राबाहेर शेतातून पुराचे पाणी वाहत आहे. तर तब्बल ७-८ मीटर उंच पाणीपातळीवर पाणी प्रवाह वेगाने वाहत आहे.

जामखेड तालुक्यातील सीना लगतच्या कवडगाव,गिरवली,देवकरवस्ती,आगी,जवळा या गावातील शेतक-यांनी सुरक्षित स्थळी जाणे योग्य होणार आहे. रात्री पुर परिस्थिती वाढण्याचा धोका अधिक आहे. वेळीच गावपातळीवर सुरक्षेचा निर्णय घेणे आवश्यक आहे.

संगोबा (ता.करमाळा) येथे अत्यंत बिकट पुर परिस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या लोकांनी आदिनाथ मंदिरात आश्रय घेतला आहे.
जामखेड शहराच्या वरच्या भागात भुतवडा तलाव परिसरातील शेती पाण्याखाली आहे. रात्रीच्या वेळी पाऊस होण्याची शक्यता आहे. नदिकाठी शेत वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी जाणे अवश्यक आहे.
दिवशभर भरपूर प्रयत्न केले गेले. मात्र ते पुरक ठरले नाही.
सतर्कता बाळगण्याची गरज आहे. सुरक्षितस्थळी नागरिकांनी जाण्याची गरज आहे.
जामखेड तालुक्यात महसुल विभागात प्रभारी आधिकारी असल्याने तालुक्यातील कोणतीच माहिती मिळत नाही.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!