Homeव्हिडिओ बातम्यातपनेश्वर शाळा अडगळीत ; ना धड रस्ता ना संरक्षण भींत . एसएमसी...

तपनेश्वर शाळा अडगळीत ; ना धड रस्ता ना संरक्षण भींत . एसएमसी अध्यक्षस्थानी दिले नगराध्यक्षांना विविध मागण्यांचे निवेदन .मोकाट जनावरांचा मोकाट वावर

तपनेश्वर शाळा अडगळीत ; ना धड रस्ता ना संरक्षण भींत:

एसएमसी अध्यक्षस्थांनी दिले नगराध्यक्षांना निवेदन

मोकाट जनावरांचा मोकाट वावर

 

जामखेड  प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून जामखेड शहरातील तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा रस्ता व संरक्षक भिंत वादात असल्याने काम प्रलंबित राहिले आहे .या शाळेत अनेक सुविधांचा अभाव आहे .त्यामुळे पालक वर्गातून राग व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत . संबधित प्रशासन व आमदार तसेच नगरपरिषद प्रशासनाला याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी वेळोवेळी लेखी तोंडी पाठपुरावा केला मात्र या लोकांकडून शाळेला अद्याप रस्ता संरक्षण भिंत तसेच भौतिक सुविधांबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही .

त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालक उदासीन आहेत .याबाबत पालकामधून कोणत्याही क्षणी मोठे आंदोलन उभा राहण्याची शक्‍यता वर्तविले जात आहे . नूकतेच
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार यांनी जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्याकडे निवेदनाद्वारे शाळेतील समस्या सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्षा यांना दिलेल्या
निवेदनात म्हटले आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असून, नगर परिषदेने शाळेला सुमारे दोन हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उपलब्ध करून द्यावी. तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सुविधाही द्यावी.

याशिवाय शाळेच्या संरक्षण भिंतीचे मंजूर झालेले काम जागेच्या वादामुळे अपूर्ण असून, संबंधित अडचण दूर करून उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण भिंत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शाळेच्या परिसरात आठवड्यातून किमान दोन वेळा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. संरक्षण भिंत नसल्याने परिसरात भटक्या कुत्र्यांसह जनावरांचा वावर होत असून त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षरीने नगर परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


—————
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा; पालकांची प्रशासनाकडे मागणी
——————-
सध्या ३० जून ते २९ जुलै या कालावधीत शाळेतील शिक्षक विविध शासकीय कामांवर ऑन ड्युटी आहेत. आमच्या शाळेतील आठ शिक्षकांपैकी चार शिक्षक मतदार नोंदणी अधिकारी(BLO) म्हणून कार्यरत असल्याने नियमित अध्यापनावर परिणाम होत आहे. त्यामुळे इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे सराव वर्ग बंद ठेवावे लागले आहेत. इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणाचेही नुकसान होत आहे. ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) चे कामकाज सुरू राहणार असल्याने ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व सहावीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्गशिक्षकाला सलग चार दिवस प्रशिक्षणासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी पालकांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
———-
मोकाट जनावरांना रस्ता पण विद्यार्थ्यांना नाही ??
——————
शहरात मोकाट जनावरांचा वावर सर्वत्र वाढला आहे . तपनेश्वर शाळा ही अडगळीच्या भागात आहे .शहरातील कोपर्‍यात नदीकाठी कोणत्याही रस्त्याला जोडली जात नाही अशा ठिकाणी आहे .त्या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाला आधिकारी, पदाधिकारी यांना जाणे अवघड वाटते अशा ठिकाणी पालक व विद्यार्थी मोठय़ा अडचणींतून मिळेल त्या मार्गाने शाळेत प्रवेश करतात .शाळेचा परिसर वेड्या बाभळी काटेरी झाडे झूडुपांनी वेढलेला आहे .मोकाट जनावर मात्र कोणत्याही दिशेने शाळेच्या आवारात घुसून फिरतात याचा मुलांना धोका होऊ शकतो .याची जाणीव प्रशासनाने वेळीच घेण्याची गरज आहे .

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!