ओ सेठ, आम्ही या पूलावरून जाऊ का थेठ :
जून्या पुलावर खड्डेच खड्डे
डागडुजी महामार्ग ,सार्वजनिक बांधकाम कोणाची जवाबदारी
नागरिक,वाहनांची होते बेजारी
नागरिक,वाहनांची होते बेजारी
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात विंचरणा नदीवर आणखी एक पुल बनवला आहे .मात्र जून्या पुलावर रस्त्यावर मोठमोठ पडलेले खड्डे जीवघेणे ठरू शकतात.पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले आहे .वाहन चालकांना रस्त्यावर खड्ड्यांचा अंदाज येत नाही .त्यामुळे वाहनांचे नुकसान तसेच प्रवाशांच्या आरोग्याचे ही नूकसान होत आहे .अनेक अपघात झाले आहेत .एखादी घटना जीवघेणी ठरु शकते .
खड्ड्यांमुळे कोणी पुलाखाली पडण्याची शक्यता आहे. प्रत्येकजण जाता येता संबधित आधिकारी व पुढारयांना आशिर्वाद देत आहेत. नवीन पुलाचे काम झाले मात्र जुन्या पुलावरील रस्त्याची दुर्दशा झाली आहे . विंचरणा नदीच्या काठावर बसवलेल्या भगवान शिवशंकराच्या भव्य मूर्तीसमोर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या जवळच पुलावर पडलेले मोठ मोठे खड्डे बुजविणे अत्यंत आवश्यक आहे मात्र या खड्डयांकडे आधिकारी व पदाधिकारयांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. सर्वच राजकीय सामाजिक पुढारी याच खड्यातुन जात आहे.
मात्र त्यांना खड्डेमय रस्त्याची जाणीव होत नसावी असे नाही .मुळातच नागरिकांच्या सोई सुविधा प्रति या आधिकारी पुढारयांना काहीही घेणे देणे दिसत नाही .
सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद प्रशासनाला विनंती आहे की त्या जीव घेण्या खड्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणीतरी ते जीवघेणे खड्डे बुजवावेत.कोणाच्या आंदोलनाची वाट बघु नये.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215