सर्वसमावेशक चेहरा -पत्रकार नासीर सय्यद नगरपरिषद निवडणूक रिंगणात :: गोरगरीबांचा खरा आवाज नासीर (चाचु ) सय्यद, नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी जनतेकडून आग्रह
जनतेच्या आग्रहावरून उमेदवारीसाठी होत आहे जोरदार मागणी!
जामखेड शहरात सर्वपरिचित व सर्मावसमावेश असलेले पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद यांना नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी जनतेकडून आग्रह होत आहे. गेली तीन दशके अविरत कार्य करणारे नासीर चाचू सय्यद हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेतून त्यांनी गोरगरीब आणि वंचित जनतेच्या समस्यांना आवाज देत न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. आता तेच नासीर चाचू सय्यद जनतेच्या हक्कांसाठी थेट व्यवस्थेत जाऊन लढा देण्याच्या तयारीत आहेत.
जामखेड नगरपरिषद निवडणूक म्हणजे जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची आणि समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची सुवर्णसंधी आहे, असे म्हणत नासीर चाचू सय्यद यांनी नागरिकांमध्ये सकारात्मकतेचा संदेश दिला आहे.
त्यांच्या समाजकारणाची व्याप्ती केवळ एखाद्या प्रभागापुरती मर्यादित नाही. सदाफुलेवस्ती, प्रभाकर नगर, अहिल्या वस्ती आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या प्रत्येक लहानमोठ्या अडचणीला प्रतिसाद देत, नासीर चाचू सय्यद यांनी अनेकांची कामे एकही रुपया न घेता केली आहेत. म्हणूनच आज सर्व स्तरातील नागरिक त्यांना “जनतेचा चाचू” म्हणत सन्मानाने हाक मारतात.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत लोकवर्गणी जमवून नागरिकांनीच त्यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले होते. त्यावेळी थोडक्यात विजय हुकला असला, तरी आज नव्या प्रभाग रचनेनंतर त्यांचा पाठिंबा अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.
RELATED ARTICLES





