Homeव्हिडिओ बातम्याखर्डा पोस्ट ऑफिसचा भोंगळ कारभार: उद्धट कर्मचाऱ्यांमुळे नागरिक हैराण; बदली न झाल्यास...

खर्डा पोस्ट ऑफिसचा भोंगळ कारभार: उद्धट कर्मचाऱ्यांमुळे नागरिक हैराण; बदली न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

खर्डा पोस्ट ऑफिसचा भोंगळ कारभार: उद्धट कर्मचाऱ्यांमुळे नागरिक हैराण; बदली न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा
जामखेड प्रतिनिधी

खर्डा येथील पोस्ट आँफीस मधील बेफिकीर व मुजोर कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

येथील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे आणि ग्राहकांना मिळणाऱ्या उद्धट वागणुकीमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, महिला भगिनी व व्यापारी वर्ग अक्षरशः वैतागले आहेत. भारत सरकारच्या अधिपत्याखालील पोस्ट खात्यावर सामान्य जनतेचा मोठा विश्वास असून नागरिक मुदत ठेव, नवीन खाती उघडणे व विविध शासकीय योजनांमध्ये गुंतवणूक करतात. ग्रामीण भागात पोस्टाच्या व्यवहारांबाबत नेहमीच विश्वासाचे वातावरण राहिले आहे; मात्र खर्डा येथील बेफिकीर व मुजोर कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सध्या ऑनलाईन व्यवहारांमुळे अनेक ग्राहक आपल्या खात्यावर फोन-पे द्वारे पैसे पाठवतात. मात्र, तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर त्रुटींमुळे अनेक ग्राहकांची खाती ‘होल्ड’ दाखवली जातात. याबाबत ग्राहक विचारणा करण्यासाठी गेले असता, त्यांना नीट माहिती न देता उद्धट व अरेरावीची भाषा वापरून हुसकावून लावले जाते. ग्राहकांना दमदाटी करण्यापर्यंत या कर्मचाऱ्यांची मजल गेली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांची बदली करावी, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.तसेच, पोस्ट ऑफिसमधील अंतर्गत कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी असावा आणि टपाल वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बाहेरचे काम पाहावे, अशीही स्पष्ट मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या कारभारात लवकरात लवकर सुधारणा करून संबंधित उद्धट कर्मचाऱ्यांची खर्डा पोस्ट ऑफिसमधून बदली करण्यात यावी, याबाबत प्रवरा डाक घर (अहिल्यानगर) कार्यालयाने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार दत्तराज पवार, सुनील गोलेकर, रवी उदावंत, मोहसीन तांबोळी, संभाजी गोलेकर, तोफिक शेख व इतर ग्रामस्थांनी दिला आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!