Homeव्हिडिओ बातम्याखर्डा परीसरातील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा ग्रामस्थांकडून 'स्टिंग ऑपरेशन'द्वारे भांडाफोड; वेश्याव्यवसाय बंद...
खर्डा परीसरातील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा ग्रामस्थांकडून ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे भांडाफोड; वेश्याव्यवसाय बंद करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ११२ च्या काँलकडे पोलीसांचे दुर्लक्ष ? त्या हाँटेलमधील वेश्याव्यवसायाला कोणाचे अभय ? पोलीसांना गांभीर्य नाही ?
खर्डा परीसरातील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा ग्रामस्थांकडून ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे भांडाफोड;
वेश्याव्यवसाय बंद करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
११२ च्या काँलकडे पोलीसांचे दुर्लक्ष ?
त्या हाँटेलमधील वेश्याव्यवसायाला कोणाचे अभय?
पोलीसांना गांभीर्य नाही ?

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील खर्डा-जामखेड मुख्य रस्त्यावरील एका हॉटेलच्या वरील लॉजमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा स्थानिक ग्रामस्थांनी स्वतः ‘स्टिंग ऑपरेशन’ करून पर्दाफाश केला आहे. या गंभीर प्रकाराकडे खर्डा पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, सदर व्यवसाय कायमचा बंद न झाल्यास जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
जामखेड तालुक्यात स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेकडून अवैध व्यवसायांवर कारवाया होत असल्याचा दावा केला जात असला, तरी खर्डा शहराजवळील एका पेट्रोल पंपाशेजारील हॉटेलच्या वर असलेल्या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू होता. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही पोलिसांनी दखल न घेतल्याने ३० ऑगस्ट रोजी संतप्त ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेतला. ग्राहक बनून गेलेल्या ग्रामस्थांनी या वेश्याव्यवसायाचे थेट व्हिडिओ चित्रीकरण केले. यावेळी हॉटेल चालकाने तुम्ही हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांची शुटींग का करता तुम्हाला वर लॉज मध्ये जाऊन काय करायचे ते करा असे म्हणत ग्रामस्थांशी वाद घालत, “आम्ही कोणाला घाबरत नाही, तुम्हाला बघून घेऊ,” अशी धमकी दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ ११२ या आपत्कालीन नंबरवर संपर्क साधला. मात्र, एका तासापेक्षा जास्त वेळ उलटून आणि पुन्हा फोन करूनही संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी लवकर पोहोचले नाहीत.
यानंतर उशीरा पोलीसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अखेर ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली.
हे हॉटेल बांधखडक, दरडवाडी, पांढरेवाडी आणि खर्डा शहर या मध्यवर्ती परिसरात खर्डा-जामखेड मुख्य रस्त्यावर आहे. या मार्गावरून दररोज शालेय मुले-मुली, नागरिक आणि व्यायामासाठी जाणारे तरुण ये-जा करतात. या हॉटेलवर आंबटशौकिनांची वर्दळ वाढत चालल्याने शिक्षण आणि करिअरवर लक्ष देण्याच्या वयात स्थानिक तरुण भरकटत असून, त्यांच्यावर याचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे.
परिसरातील सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा हा वेश्याव्यवसाय त्वरित व कायमचा बंद करण्यात यावा आणि हॉटेल चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास बांधखडक, दरडवाडी, पांढरेवाडी व खर्डा परिसरातील नागरिक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठे आंदोलन उभारतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या व्यवसायाला कोणाचे अभय मिळत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . 
—-
पोलीसांना गांभीर्य नाही ?
—-
११२ नंबरला फोन केला असता काय कारवाई केली याबाबत खर्डा पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस निरीक्षक यांनी मी बाहेर आहे माहीती घेऊन सांगतो म्हणाले मात्र १२ तासांनंतरही माहिती दिली नाही .इतर पोलीसांनी फोन घेतले नाहीत. ज्यांनी घेतला त्यांना काही माहिती नाही .यावरून पोलीसांना घटनेचे गांभीर्य लक्षात येते .आता याप्रकरणी पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!