Homeव्हिडिओ बातम्याकायदा व सुव्यवस्था धाब्यावर ?? रिक्षा हटविण्याच्या किरकोळ कारणावरून हिंसक मारहाण .गंभीर...
कायदा व सुव्यवस्था धाब्यावर ?? रिक्षा हटविण्याच्या किरकोळ कारणावरून हिंसक मारहाण .गंभीर जखमींवर अहिल्यानगरला उपचार सुरू
कायदा सुव्यवस्था धाब्यावर ??
रिक्षा हटविण्याच्या कारणांवरून हिंसक हाणामारी
गंभीर जखमींवर अहिल्यानगरला उपचार सुरू

जामखेड प्रतिनिधी
सहन करण्याची शक्ती माणसांची कमी झाली असुन माणुसकी खालच्या पातळीवर तर राग आणि हिंसा वर आली आहे .जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथे रिक्षा हटविण्याच्या किरकोळ कारणावरून ३०-४० जणांच्या टोळक्याने एकाच कुटुंबातील लोकांवर हिंसक हल्ला करत मारहाण केली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या मारहाणीत लाकडी दांडके कोयते राँडचा पाईपचा वापर केला असल्याचे नागरिकांकडुन समजते .
रिक्षा हटविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या हिंसक मारहाणीत गंभीर जखमी झालेल्यांवर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत .
परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सदर घटनेतील जखमींना भेटुन माहिती जामखेड पोलिसांकडून घेतली जात आहे .गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून समजले.
जामखेड शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख चढताच दिसत आहे .कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही धाक गून्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राहिलेला दिसत नाही . रोजच चोऱ्या ,हिंसक मारामाऱ्यांच्या घटना घडत आहेत .या घटनेतील तसेच अशा हिंसक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर गून्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!