Homeव्हिडिओ बातम्याएक वर्षासाठी हद्दपार तरीही जामखेड मध्येच वास्तव .सराईत आरोपी गावठी पिस्टलसह जेरबंद...

एक वर्षासाठी हद्दपार तरीही जामखेड मध्येच वास्तव .सराईत आरोपी गावठी पिस्टलसह जेरबंद .स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कोम्बिंग ऑपरेशन

एक वर्षासाठी हद्दपार तरीही जामखेड मध्येच वास्तव

सराईत आरोपी गावठी पिस्टलसह जेरबंद

जामखेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे कोम्बिंग ऑपरेशन;

जामखेड प्रतिनिधी :

जामखेड मधुन एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी जामखेडमध्येच राहत होता .स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे गावठी पिस्टलही आढळून आले .

अहिल्यानगर जिल्ह्यातील गंभीर गुन्हे तसेच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात १२ ऑगस्ट रोजी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीला गावठी पिस्टल, मॅगझीन आणि जिवंत काडतुसासह जेरबंद केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार फुरकान शेख, रोहित मिसाळ, मनोज साखरे, प्रताप देवकाते, अमोल कोतकर व जालींदर साखरे यांचे पथक तयार करण्यात आले होते. सराईत गुन्हेगारांची तपासणी तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला देण्यात आल्या होत्या.

१३ ऑगस्ट रोजी कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना गोपनीय बातमीदारामार्फत सागर बाळू लोखंडे (वय २६, रा. आरोळेवस्ती, जामखेड) हा अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असतानाही जामखेड-श्रीगोंदा रोडवरील हॉटेल गंगाईजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन सागर लोखंडे याला ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल, एक मॅगझीन व त्यामध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, गावठी पिस्टल व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी गणेश दादासाहेब भवर (रा. कळसपिंप्री, ता. पाथर्डी) याच्याकडून आणल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील गणेश भवर हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सागर लोखंडे याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५३/२०२६ नुसार आर्म्स ॲक्ट कलम ३/२५, ७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हद्दपारीचा कालावधी संपलेला नसतानाही तो जामखेड परिसरात आढळून आल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!