Homeव्हिडिओ बातम्याएक शिंदेंनी डावलले दूसरया शिंदेंनी सावरले :अखेर धनुष्य बाण आला आकाश बाफना...

एक शिंदेंनी डावलले दूसरया शिंदेंनी सावरले :अखेर धनुष्य बाण आला आकाश बाफना यांच्या हाती :महायुती, आघाडीत बिघाडी सर्वच स्वबळावर :सौ पायलताई आकाश बाफना शिवसेनेच्या उमेदवार ;

 

एक शिंदेंनी डावलले दूसरया शिंदेंने सावरले!” 

अखेर धूनष्य बाण आला आकाश बाफना यांच्या हाती

महायुती, आघाडीत बिघाडी सर्वच  ; सर्वच स्वबळावर

सौ पायलताई आकाश बाफना शिवसेनेच्या उमेदवार 

जामखेड प्रतिनिधी
आपल्या कल्पकदृष्टीने व कामातून लोकाभिमुख झालेले युवा उद्यजोक आकाश बाफना जामखेडचे नगराध्यक्ष होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जनतेचे विविध काम करत आहोरात्र मेहनत घेत आहेत.
आकाश बाफना यांनी आपल्या सौभाग्यवती पायलताई आकाश बाफना यांच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपा, राष्ट्रवादी (शप), काँग्रेस अशा अनेक पक्षांकडे आकाश बाफना यांनी मागणी करत अनेक चकरा मारल्याचे सुत्रांकडून समजते. मात्र आ. रोहित पवार व सभापती प्रा राम शिंदे यांच्यासह सर्वांनी डावलले मात्र आकाश बाफना शांत बसले नाहीत. आपल्या कुशाग्र बुध्दीचा वापर करत थेट शिवसेनेचा बाण गाठला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
आकाश बाफना यांना राम शिंदेंनी डावलले पण एकनाथ शिंदे यांनी सावरले अशी चर्चा आहे. नगरपरिषद निवडणूकीत महायुतीत ताळमेळ राहिला नाही. तसेच महाविकासआघाडीतही ताळमेळ दिसत नाही तेव्हा सर्वच पक्ष स्वबळावरच निवडणूकीला सामोरे जाण्यास तयार झाले आहेत.
आकाश बाफना व मित्र परिवार खुप मेहनत करतांना दिसत आहेत. आकाश बाफना यांच्या निर्णयाने प्रस्थापित व सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनाही अचंबित केले आहे. जामखेड शहरात आकाश बाफना यांच्या आदर्श फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चातून जोरदार काम चालू आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. पायलताई आकाश बाफना या स्वतः जनतेत जाऊन समाजातील विविध घटकातील लोकांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतांना दिसत आहेत. मनमिळाऊ पायलताई बाफना यांच्या कामाची पध्दत पाहून नागरीकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
पायलताई आकाश बाफना यांच्या शिवसेनेतला प्रवेश व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीने जामखेडच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!