Homeव्हिडिओ बातम्याआण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने महाराष्ट्रात परिवर्तनाची चळवळ उभी केली :- आकाश...

आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने महाराष्ट्रात परिवर्तनाची चळवळ उभी केली :- आकाश बाफना .साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली : आकाश बाफना

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन:

जामखेड प्रतिनिधी

काही माणसं जन्माने मोठी नसतात, तर आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात. लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे हे त्यापैकीच एक होते. त्यांना औपचारिक शिक्षण फारसं मिळालं नसले, तरी जीवनाच्या विद्यापीठाने त्यांना घडवलं. त्यांनी दिन-दलित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना स्वतः अनुभवल्या. त्यामुळे त्यांच्या लेखणीतून केवळ शब्द नव्हे, तर वेदना, स्वाभिमान आणि सामाजिक क्रांतीचा आवाज उमटला. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभी केली, असे प्रतिपादन शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शहरातील साठेनगर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना युवा नेते आकाश बाफना व मित्रमंडळाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमास ओबीसी नेते शिवकुमार डोंगरे, पांडुरंग माने, स्वप्निल खाडे, विकी पिंपळे तसेच साठेनगरचे अध्यक्ष शरद मोरे, किशोर कांबळे, रवि डाडर, दत्ता क्षिरसागर, दादा डाडर, आतिष डाडर, मनोज डाडर, सोनू क्षिरसागर, प्रेम कांबळे, विनोद कांबळे, नितीन डाडर, गणेश वाघमारे, शेखर मोरे, जितेश डाडर, ओम डाडर, सुमित डोलारे, दीपक रिटे, दादा अडागळे, रविंद्र डाडर, बाळू डाडर, अविराज क्षिरसागर, सुमित घायतडक, क्रिश खंडागळे, संतोष थोरात, सागर कांबळे, सचिन कांबळे, कृष्णा कांबळे, पियुष मोरे, अनुप साठे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!