Homeव्हिडिओ बातम्यासामाजिक चळवळीतलं नेतृत्व ; समाजाच्या हितासाठी राजकारणात ! विकीभाऊ सदाफुले ...

सामाजिक चळवळीतलं नेतृत्व ; समाजाच्या हितासाठी राजकारणात ! विकीभाऊ सदाफुले प्रभाग ४ मधून नगरसेवकपदासाठी निवडणुकीची तयारी

 

सामाजिक चळवळीतलं नेतृत्व ; समाजाच्या हितासाठी राजकारणात !
विकीभाऊ सदाफुले प्रभाग ४ मधून नगरसेवकपदासाठी निवडणुकीची तयारी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड मधील सामाजिक चळवळीतलं एक नाव म्हणजे विकीभाऊ सदाफुले होय! समाजासाठी गेल्या चौदा वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवीत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आघाडीवर उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले हे जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मधून इच्छुक उमेदवार असून जनसेवा हाच धर्म या भूमिकेतून निवडणुकीत उतरतील, अशी घोषणा त्यांनी केली. लोकचळवळीतून उभा राहिलेला सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून प्रभागातील सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत लढा दिला आहे.

लोकआंदोलनातून घडलेले नेतृत्व म्हणजे विकी सदाफुले यांनी २०१२ साली दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सदाफुले वस्ती येथे स्मशानभूमीसाठी रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच २०१३ मध्ये अपघातांचा वाढता धोका लक्षात घेऊन जामखेडमधील महत्त्वाच्या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी, निवेदन व रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला कृतीला भाग पाडले. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांनी समाजप्रबोधन उपक्रम, स्वच्छता मोहिमा आणि
सांस्कृतिक कार्यक्रम राबवत सामाजिक ऐक्य निर्माण केले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान महोत्सव कार्यक्रम आयोजित करत समाजातील युवकांना संविधानिक मूल्यांची जागृती केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विविध संघटनांच्या आंदोलनात सहभाग एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत चक्का जाम आंदोलन, न्याय्य मागण्यांसाठी भूमिका, कोरोना काळात रुग्णांना फळे, मास्क, सॅनिटायझर वाटप, शहर परिसरात वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविले. निर्मल भारत योजनेतील शौचालय अनुदानात झालेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला. चौकशी समितीच्या स्तरावर पाठपुरावा करून गटविकास अधिका-यासचळवळीतून राजकारणात !
पाणीटंचाईच्या काळात उपोषण करत प्रशासनाला निर्णय घ्यायला भाग पाडले. हा विकीभाऊंच्या संघर्षाचा मोठा यशस्वी परिणाम ठरला.
जामखेड नगरपरिषदच्या भोंगळ कारभारा विरोधात खर्डा चौक रास्तारोको आंदोलन, मुस्लिम आंदोलनात सहभागी, प्रभाग ४ मध्ये पाणी टंचाई संदर्भात संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन, शहरातील प्रमुख रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात घेराव आंदोलन केले. भटके-विमुक्त समाजासाठी मेळावा, शैक्षणिक-माहिती शिबिरे आणि योजना मार्गदर्शन आयोजित करून दुर्लक्षित घटकांपर्यंत मदत पोहोचवली. विशेष म्हणजे सदाफुले यांचे बंधू सुशीलकुमार सदाफुले हे जामखेड पंचायत समिती उपसभापती पदावर काम केले आहे.
यावेळी बोलताना विकी सदाफुले यांनी सांगितले की, पद म्हणजे सत्ता नाही; ती जबाबदारी आहे. जामखेडच्या प्रभाग ४ मधील नागरिकांसाठी काम करण्याची ताकद जनतेच्या विश्वासातून येते. पारदर्शक, आणि विकासाभिमुख प्रशासन निर्माण करणे हेच माझे ध्येय आहे. तसेच प्रभागातील पाण्याच्या समस्यांवर शाश्वत उपाय, गटार, रस्ते व स्वच्छता व्यवस्था सुधारणा, महिलांसाठी स्वयंरोजगार उपक्रम, तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन व क्रीडा साहित्य, शाळांमध्ये डिजिटल सुविधा व पायाभूत सुधारणा, लोकचळवळीतून तयार झालेले त्यांचे नेतृत्व आगामी निवडणुकीत कोणता बदल घडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!