विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम ,युवा नेते आकाश बाफना यांच्या संकल्पनेतून जि.प शाळांमध्ये प्रथमोपचार पेटीचे वितरण
शिवसेना महाराष्ट्र राज्याचे पक्ष सचिव माननीय श्री.राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते आकाश बाफना यांच्या संकल्पनेतून तसेच सामाजिक कार्यकर्त्या पायलताई बाफना मित्र परिवार व शिवसेना जामखेड तालुका जामखेड यांच्या वतीने जामखेड शहरासह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेला प्रथमोपचार पेटीचे वाटप आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमुख मोहन देवकाते यांनी दिली.
दिनांक २५ जुलै रोजी पासून आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले व शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये वितरण करण्यात येणार आहे.
RELATED ARTICLES


त्याच अनुषंगाने या प्रथमोपचार पेटीचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पेटीचे अनावरण करण्यात आले.यावेळी तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार डोंगरे, ज्येष्ठ नेते कैलास जाधव, पांडुरंग माने, विकी पिंपळे, दत्तात्रय जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215