Homeव्हिडिओ बातम्यासरकार लोकशाहीविरोधी आहे :- अँड अरूण जाधव .सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला वंचित...

सरकार लोकशाहीविरोधी आहे :- अँड अरूण जाधव .सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जामखेडमधून इतर कोणाची हिम्मत होईना ; सोनम वांगचुक यांना कोणी पाठींबा देईना

हे सरकार लोकशाहीविरोधी आहे :- अँड अरूणजाधव

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

जामखेडमधून इतर कोणाची हिम्मत होईना ; सोनम वांगचुक व विद्यार्थ्यांना कोणी पाठींबा देईना

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील खर्डा चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सोनम वांगचुक यांचे बॅनर हातात घेऊन घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते खर्डा चौकात एकत्र जमले होते. आंदोलनाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला.

संपूर्ण देशातून विविध क्षेत्रातली मान्यवरांसह सामान्य माणूस दिल्लीत जंतर मंतरवर होत असलेल्या आंदोलनाला पाठींबा देत आहे .अनेक जण प्रत्यक्ष दिल्लीकडे जातांना दिसत आहे .देशभरात जिल्हा, तालूका, गाव स्तरावर आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे .मात्र वंचित बहुजन आघाडी शिवाय जामखेड मधुन इतर कोणाची दिल्लीतील आंदोलनानाला पाठींबा देण्याची हिम्मत होईना.लोकशाही कळेना की सत्ताधाऱ्यांची भीती की हितसंबंध ,जवळीकता की बघ्याची भूमिका …!

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतांना ॲड. अरुण जाधव म्हणाले की, हे सरकार लोकशाहीविरोधी आहे .”नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि अनियमिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असतानाही केंद्र सरकार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे. वंचित बहुजन आघाडी राज्यभर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पूर्ण ताकदीने पाठिंबा देईल.

या आंदोलनात नगरसेविका संगीताताई भालेराव, भीमराव चव्हाण, गणपत कराळे, सूरज भालेराव, सुमित भालेराव, विकी कांबळे, ऋषी गायकवाड, राहुल धेंडे, मंगल काळे, सुविकास काळे, दत्तात्रय धेंडे, बारुद सय्यद, मच्छिंद्र जाधव, सागर कांबळे, गणेश घायतडक, जालिंदर जाधव, बेडकूत्या काळे, अरविंद जाधव, रोहिणी काळे, परमेश्वर काळे, विकास काळे, गोटीराम काळे, बापू काळे, सूरज शिंदे, अंकल घायतडक, अविनाश ओहोळ, अक्षय शिरोळे, सुशील राजगुरू, मनोज घायतडक, दादा साळवे, सचिन सदाफुले, सोहेल आतार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!