Homeव्हिडिओ बातम्याभारत पाकिस्तान यूध्द तणाव अनुषंगाने नागरिकांना जाहीर आवाहन विशेष सुचनांचे पालन...

भारत पाकिस्तान यूध्द तणाव अनुषंगाने नागरिकांना जाहीर आवाहन विशेष सुचनांचे पालन करावे :- पोलीस निरीक्षक महेश पाटील

🛑🛑 *भारत आणि पाकिस्तान देशातील सुरु असलेले युद्ध तणावं अनुषंगाने नागरिकांना जाहीर आवाहन* 🛑🛑

 

जामखेड प्रतिनिधी

भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या युद्धतणावाच्या पार्श्वभूमीवर, जामखेड पोलीस आणि प्रशासन यांनी सर्व नागरिकांना सुरक्षा, सावधगिरी आणि जागरुकतेबाबत विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य; विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परीक्षेत्र; जिल्हाधिकारी, अहिल्यानगर; तसेच पोलीस अधीक्षक, राकेश ओला यांच्या निर्देशांनुसार हे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने जागरूकतेबाबत विशेष सुचना जारी केल्या आहेत.

 

 

**अफवांवर विश्वास ठेवू नका:*

२. ⁠*फक्त सरकारी अधिकृत स्रोतांकडून (जसे की आकाशवाणी, दूरदर्शन, सरकारी वेबसाइट्स किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्स) मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवा.*

३. *कोणत्याही धार्मिक, जातीय भावना दुखावतील अशा टिप्पणी करू नका*

 

४. ⁠*सोशल मीडिया,* *व्हॉट्सऍप, किंवा अज्ञात स्रोतांवर येणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नका.*

 

५. ⁠*जर तुम्हाला संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसली, तर त्वरित पोलिस किंवा प्रशासनाला कळवा. Dial 112 ची योग्य मदत घ्या.*

 

६. ⁠*माहितीची पडताळणी:** *कोणतीही बातमी सामायिक करण्यापूर्वी ती “फॅक्ट-चेक” करा. खोटी माहिती पसरवणे गुन्हा आहे.*

७. ⁠*कोणत्याही प्रकारची अनोळखी apk file, link ओपन करू नये. त्यामागे विघातक कृत्य/*सायबर अटॅक* *असू शकते अथवा शत्रू राष्ट्र आपली महिती चोरी करू शकते.*

 

८. ⁠*शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करा.*

 

९. ⁠*ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत अधिकारी आणि पोलीस अंमलदार पोहोचवतील त्यावेळी जास्तीत -जास्त लोकांनी यामध्ये माहिती घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे

10. *अहिल्यानगर पोलिसांचा सायबर सेल समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत असून पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करत असून शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर गुन्हे नोंद करण्यात येतील.*

 

11. *सर्व सोसायटी मधील सर्व सदस्य /नागरिकांनी बैठक घेउन त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करावी.*

12. *सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे या गुन्हा असून देशाची युद्ध तयारी ची माहिती यामुळे दुश्मन राष्ट्राला होऊ शकते यामुळे असे चित्रीकरण कोणी करू नये.*

 

*सर्व नागरिकांना अहिल्यानगर पोलीस विभाग वरील प्रमाणे निर्देशचे पालन करणाचे आवाहन करीत असून शांतता आणि विवेक राखून देशाच्या सुरक्षा

सर्व नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाच्या सुरक्षा प्रयत्नांना सहकार्य करावे, सर्वांनी शांतता, विवेक आणि एकजुटता राखून, देशाच्या सुरक्षेसाठी सहभागी व्हावे.

अंखाडीतता राखणेकरिता सहकार्य करा.

असे आवहान जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!