Homeव्हिडिओ बातम्याप्रांजलताई अमित चिंतामणी व सहकारयांची शहरासह वाड्या वस्तांवर नागरिकांशी भेटी गाठी व...

प्रांजलताई अमित चिंतामणी व सहकारयांची शहरासह वाड्या वस्तांवर नागरिकांशी भेटी गाठी व विकासात्मक चर्चा : भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रांजलताई अमित चिंतामणी यांची प्रचारात आघाडी, अमित चिंतामणी यांनी केलेल्या कामांची व लोकाभिमुख व हसतमुख व्यक्तिमत्वाची सकारात्मक चर्चा

प्रांजलताई अमित चिंतामणी व सहकारयांची वाडी-वस्त्यांमध्ये भेठी – गाठी घेत विकासात्मक चर्चा

भाजप उमेदवार प्रांजल चिंतामणी नगराध्यक्षपदाच्या प्रचारात आघाडीवर…

अमित चिंतामणी यांनी केलेल्या कामांची व हसतमुख लोकाभिमुख व्यक्तिमत्वाची सकारात्मक चर्चा

जामखेड प्रतिनिधी –

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत चर्चेत आघाडीवर असलेले प्रांजलताई अमित चिंतामणी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारातही आघाडीवर आहेत. उमेदवारी बाबत भाजपात मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. भाजपा सह सर्वाच्याच उत्कंठा शिगेला पोहोचल्या होत्या. या स्पर्धेत अखेर सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्वांगीण विचार करून प्रांजलताई अमित चिंतामणी यांच्या उमेदवारीची घोषणा केली. उमेदवारी जाहीर होताच प्रांजल चिंतामणी यांनी शहरासह सर्व वाडी-वस्त्यांमध्ये प्रचाराला वेग दिला असून, त्यांच्या प्रचार फेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक १ मधील भुतवडा येथील दौऱ्यात प्रांजल चिंतामणी यांच्यासोबत भाजप पदाधिकारी. नगरसेवक पदाचे उमेदवार सुमन अशोक शेळके आणि श्रीराम आजिनाथ डोके यांनी भेटीगाठी घेतल्या. या प्रचार फेरीला स्थानिक ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.

भाजपचे माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजल चिंतामणी यांना उमेदवारी जाहीर होताच चिंतामणी मित्रमंडळ आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे..

नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रांजलाताई अमित चिंतामणी यांचा शहरासह वाडी-वस्त्यांमध्ये प्रभावी जनसंपर्क असून राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह मिळाल्याचा लाभही त्यांना मिळत आहे.

अपक्ष उमेदवारांना चिन्ह २६ तारखेला मिळणार असल्याने भाजपचा प्रचार अधिक वेगात सुरू आहे. नगरसेवक म्हणून काम करताना अमित चिंतामणी यांनी जो विकास केला त्याबाबत सभापती प्रा राम शिंदे यांनी अमित चिंतामणी यांचा प्रभाग म्हणजे जामखेडचे “मलबार हिल ” असे गौरवोद्गार काढले होते. प्रभागात भुयारी गटार योजना, पेव्हर ब्लॉक रस्ते, सिमेंट रस्ते अशी अनेक दर्जेदार कामे पूर्ण केली. प्रांजल ताईंच्या माध्यमातून महिलांचे संघटन, नवरात्र उत्सवातील उपक्रम, ओपन दांडिया यांसारख्या उपक्रमांमुळे चिंतामणी दाम्पत्याकडे शहराच्या विकासाचे दूरदर्शी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!