Homeराजकीयसर्वधर्मसमभाव मानणारे व विकासाची दुरदृष्टी असलेले आकाश बाफना, शिवसेनेच्या पायलताई आकाश बाफना...

सर्वधर्मसमभाव मानणारे व विकासाची दुरदृष्टी असलेले आकाश बाफना, शिवसेनेच्या पायलताई आकाश बाफना यांची प्रचारात आघाडी, जामखेड विकासाच्या व्हिजनवर आकाश बाफना यांनी उभा केला तिसरा पर्याय

सर्वधर्मसमभाव मानणारे व विकासाची दुरदृष्टी असणारे आकाश बाफना

शिवसेनेच्या पायलताई आकाश बाफना यांची प्रचारात आघाडी

जामखेड विकासाच्या व्हिजनवर आकाश बाफना यांनी निर्माण केला तिसरा पर्याय

जामखेड प्रतिनिधी
विकासाची दूर दृष्टी असलेले यूवा उद्योजक आकाश बाफना यांनी जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त टक्कर दिली आहे. युवा नेते आकाश बाफना व शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगराध्यक्षा उमेदवार पायलताई आकाश बाफना व सर्व प्रभागातील नगरसेवकांच्या प्रचारात शिवसेनेने आघाडी घेतलेली दिसत आहे. सर्व शिवसेना मैदानात उतरली आहे. जामखेडच्या विकासाच्या व्हिजन सह व सर्वधर्मसमभावाचा नारा देत शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पायलताई बाफना यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस लाजबरदस्त तिसरा पर्याय निर्माण केला आहे.

आकाश बाफना यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून निवडणुक तयारी सुरु करत संपूर्ण शहर वाडी वस्तीवर मुरमीकरण, रस्ता प्रश्न, पाणी प्रश्न, विजेचा प्रश्न सोडविला यामुळे आज प्रत्येकाच्या मुखात एकच नाव आहे ते म्हणजे “जामखेड का सपना आकाश बाफना ” सर्व समाजाला बरोबर घेत प्रचाराचा शुभारंभ करत प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे.

जामखेड च्या विकासाची ब्लू प्रिंट बाफना यांच्या कडे तयार आहे. सुसज्ज रस्ते, भूमिगत गटारे, पिण्याचे स्वच्छ पाणी, चांगल्या आरोग्य सुविधा या सह स्वच्छ सुंदर जामखेड साठी शिवसेना आवश्यक आहे. आणि सत्ता मिळाली तर स्वप्नातील जामखेड तयार करू असे बाफना यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या सामाजिक कामामुळे आज जामखेडची जनता खुश आहे. बाफना यांच्या रूपाने जामखेड करांना तीसरा पर्याय निर्माण झाला आहे.

नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त निधी आणून जामखेडचा विकास करणार आहे. जामखेड शहरात दोन दिग्गज असून देखील जामखेड करांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ते नीट नाहीत, गटारांची दुरावस्था आहे. मोकाट जनावरे अशा अनेक समस्या आहेत. आम्ही जामखेडचा विकास करून चेहरा मोहरा बदलू स्वप्नातील जामखेड घडवू असे आकाश बाफना यांनी सांगितले.जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्व धर्म समभाव, विकासाचे व्हिजन, भयमुक्त जामखेड, स्वच्छ सुंदर जामखेड या मुद्द्यावर प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!