जामखेडला पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, एका दिवसात पाच जणांना चावा.
दोन गंभीर जख्मी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील तपनेश्वर नुरानी काँलनी जवळ एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून त्याने लहान मुलांना लक्ष्य केले आहे. या कुत्र्याने एका दिवसात ५ ते ६ जणांना चावा घेतला आहे त्यामुळे नागरिक भयभित झाले आहेत. कुत्र्यांची वाढत्या संखेकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे.
नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.जामखेड येथील तपनेश्वर रोडवरील रहिवासी जाबीर तांबोळी यांचा मुलगा चि.ओएस जाबीर तांबोळी वय ५ वर्षे हा दुपारी एक वाजता घराजवळ खेळ होता.
त्यावेळी मागून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढविला. अचानक हल्ला झाल्याने काही कळण्याआधीच कुत्र्याने ओएस च्या तोंडावर चावा घेतला. दुसऱ्या एका मुलाला हाताच्या बोटाला चावा घेऊन जखमी केले.
या दोन मुलांना जामखेड खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक उपचार करून अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तपनेश्वर परिसरातील आणखी पाच ते सहा जणांना कुत्र्याने चावा घेतल्याचे माहिती मिळाली आहे .
यामुळे जामखेड नगरपरिषद प्रशासनाने या पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे. 

चौकट
—तर जवाबदारी कोणाची – संतोष नवलाखा
– – –
जामखेड शहर व परिसरात मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. यामुळे रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिक, वाहनचालक, लहान मुले तसेच शालेय विद्यार्थी आदींचा प्रवास धोकादायक झाला आहे. लहान मुलांना रस्त्याने एकट्याला पाठविणे म्हणजे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. “शहरात मोकाट श्वानांनी उच्छाद मांडला आहे.
भटक्या श्वानांनी चावा घेतल्यामुळे रेबीजसारख्या आजारांची लागण होऊ शकते. अनेक वेळा ते अंगावर येत असल्यामुळे लहान बालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या नागरिकाला प्राणास मुकावे लागले तर याला जबाबदार कोण राहिल?? नगरपरिषद जबाबदार राहणार का?? .” असा उद्विग्न सवाल आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी केला आहे. 
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215