Homeव्हिडिओ बातम्याजामखेडला कोरडा दुष्काळ जाहीर राज्यातील २६५ तालुक्यात अखेर दुष्काळ जाहीर; ...

जामखेडला कोरडा दुष्काळ जाहीर राज्यातील २६५ तालुक्यात अखेर दुष्काळ जाहीर; अहिल्यानगरमधील १३ तालुक्यांचा समावेश

जामखेडला कोरडा दुष्काळ जाहीर

राज्यातील २६५ तालुक्यात अखेर दुष्काळ जाहीर;

अहिल्यानगरमधील १३ तालुक्यांचा समावेश


सिटीझन प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला.
राज्यातील सुमारे ७५ टक्के भागात दुष्काळ घोषित झाला आहे.पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने व अपुऱ्या पावसामुळे पिके करपल्याने हा निर्णय घेण्यात आला.


राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता या तालुक्यांचा समावेश आहे.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती व उपाययोजना

१. जमीन महसूलात सूट.

२. पीक कर्जाचे पुनर्गठन.

३. शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती.

४. कृषी पंपांच्या चालू वीज बिलात सूट (७.५ एचपी पर्यंतचे वीज बिल आधीच माफ, त्यावरील पंपांना सूट).

५. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
६. रोहयो (रोजगार हमी योजना) अंतर्गत कामांचे निकष शिथिल करून जास्तीत जास्त कामे सुरू करणे.
७. आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सचा वापर.

८. टंचाईग्रस्त गावांत शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे.

९. शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी व मजुरांसाठी अन्नधान्याची टंचाई भासू नये म्हणून योग्य व्यवस्था करणे.

१०. जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता करणे.

११. जलसंधारणाची कामे सुरू करणे.

१२. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर संबंधित भागातील शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून विविध सवलती व मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!