Homeव्हिडिओ बातम्याजातीय विषाणुची द्वेषाची षडयंत्री राजकीय लोकांनी कितीही लागवड केली तरी लोक शब्दशः...

जातीय विषाणुची द्वेषाची षडयंत्री राजकीय लोकांनी कितीही लागवड केली तरी लोक शब्दशः प्रेमाचा माणूसकीचा बिछाना अंथरुन इतरांचे जीव वाचवतात ! हे सगळं दिलासादायी आहे !

किती अविश्वसनीय आहे हे !

जातीय विषाणूची द्वेषाची षडयंत्री राजकीय लोकांनी कितीही लागवड केली असली तरी लोक शब्दशः प्रेमाचा, माणुसकीचा बिछाना अंथरुन इतरांचे जीव वाचवतात, हे किती दिलासादायी आहे !
…………

जामखेड प्रतिनिधी

इमारतीला भयंकर आग लागते. लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागतात; पण जाणार कुठं ? खाली उतरणं शक्य नाही. वरच्या मजल्यांवरुन उडी मारावी तर जीव जाईल, अशी भीती.

या इमारतीसमोरच एक गाद्यांचं दुकान आहे. दुकानदार आगीचा लोळ पाहतो आणि त्याच्या लाखोंच्या गाद्या इमारतीसमोर अंथरतो. लोक त्यावर तिस-या चौथ्या मजल्यावरुन उड्या मारतात. गादीवर पडल्यानं त्यांना मार कमी लागतो. त्यांचा जीव वाचतो. एक आई तर आपल्या लहानग्याला कडेवर घेऊन उडी मारते. सुमारे वीसेक लोकांचा जीव या गादीच्या दुकानदारामुळे वाचतो.

हा कोणत्याही सिनेमातला प्रसंग नाही. बुधवारी दिल्लीतल्या मालवीय नगरमध्ये घडलेली ही घटना आहे. त्याचे व्हिडिओज आहेत. लोकांचे जीव वाचवणा–या या देवदूताचे नाव रियाजुद्दीन अन्सारी.

केवळ रियाजुद्दीन अन्सारीच नव्हे तर अरमान, इसरार खान, मोहम्मद शोएब, गोविंद कुमार, वसीम राजा, मोहम्मद अफजल, शिवानी, मोहम्मद अनीस, वकार, मुस्तकीम असे अनेकजण लोकांचे जीव वाचवतात. मोहम्मद शोएबने CPR देऊन चार लोकांचे जीव वाचवले. मुस्तकीमने तर थेट इमारतीच्या आत जाऊन जखमींना चादर घालून बाहेर काढलं. ऍम्बुलन्स बोलावली. आतमध्ये अडकलेले लोक हॉटेलच्या काचा तोडत होते पण काही केल्या काचा तुटत नव्हत्या. मोहम्मद अफजलने खालून दगड मारुन काचा फोडल्या तोवर खाली गाद्या अंथरलेल्याच होत्या. इसरार खान यांचा तर भाऊच आत अडकलेला. ते विद्युतवेगाने धावत जाऊन त्यांनी बेसमेंटमधून ७ लोकांना बाहेर काढलं. शिवानी नावाच्या छोट्या मुलीने आपला भाऊ सत्यमला सोबत घेऊन हॉटेलखाली गाद्या अंथरल्या. देशराज, राजवीर, दिनेश कुमार या पोलिस कॉन्स्टेबल्सनीही वेळीच पोहोचून मदत केली.

या सगळ्या घटनांचे व्हिडिओही आहेत. ते पाहताना अंगावर काटा येतो आणि डोळे भरुन येतात. हॉटेलमध्ये तीन परदेशी नागरिक होते. त्यांचेही जीव वाचवण्याचा ही मंडळी आटोकाट प्रयत्न करतात. आतमध्ये अडकलेल्या लोकांचा जात, धर्म, वंश, लिंग, देश काय, याचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालतात.

किती विलक्षण आहे ! किती अद्भुत आहे !

द्वेषाची कितीही लागवड केली असली तरी लोक शब्दशः प्रेमाचा, माणुसकीचा बिछाना अंथरुन इतरांचे जीव वाचवतात, हे किती दिलासादायी आहे !

कुणाच्या ओळी आहेत, आठवत नाही; पण कवी म्हणतोः

क्या-क्या ग़ुबार उठाए नज़र के फ़साद इंसानियत की लौ कभी मद्धम न हो सकी !

म्हणून वाटतं अजूनही जगावंसं.
आणि विंदा म्हणतातः जिचा आत्मा एक, ती जनता अमर आहे !

————

जातीयतेचा विषाणू’ हा समाजमनाला लागलेला एक असा मानसिक आजार आहे जो पिढ्यानपिढ्या मानवी मूल्यांचा आणि सामाजिक सलोख्याचा ऱ्हास करत आहे. हा जन्माने मिळत नसून, तो वातावरणातून आणि चुकीच्या संस्कारातून प्रत्येकाच्या मनात नकळत प्रवेश करतो. ही एक संकुचित मानसिकता आहे, जी माणसाला दुसऱ्या माणसापासून वेगळे करते. या विषाणूमुळे समाजात अकारण द्वेष, संशय आणि सामाजिक तेढ निर्माण होते. या जातीय विषाणूला खतपाणी स्वार्थी राजकीय लोक घालत आहेत . समाजातील सुज्ञ नागरिक या गोष्टी जाणुन आहेत मात्र सकारात्मक विरोध करत नसल्याने या स्वार्थी राजकारणी लोकांचे षडयंत्री वाढत असुन माणसामाणसात मनामनात जातीयतेचा द्वेषाचा विषाणूंची वाढ होत आहे.मात्र वरिल घटनेवरून माणुसकीचा बिछाना अंथरुन इतरांचे जीव वाचविण्याच्या घटनेवरून माणुसकी हाच खरा धर्म आहे तोच मोठा आहे हा बोध घ्यावा असे वाटते.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!