खर्डा पोलीसांनी रोखला बालविवाह.
अल्पवयीन मुलीचे १४ वर्षे वय
जामखेड प्रतिनिधी
पोलिसांनी लोणी येथील १४ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला;यापुर्वीही दोन गुन्हे दाखल, पालकांना कायदेशीर समज देत कडक कायदेशीर इशाराही दिला आहे.

दि २९ एप्रिल २०२६ – खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लोणी येथे जाऊन होऊ घातलेला बालविवाह रोखला. सदर ठिकाणी १४ वर्षे आणि १ महिना वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता तातडीने थांबवला. तसेच दोन्ही कडील पालकांना बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ बाबत स्पष्ट सविस्तर माहिती दिली.
पालकांनीही त्या ठिकाणी शपथ घेऊन कबूल केले की, सदरचा विवाह आता ते करणार नाहीत. मुलीच्या वयाची सीमा १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्या इच्छेनुसार विवाह लावण्याचे आश्वासन दिले.
खर्डा पोलीस स्टेशनने यापूर्वीच बालविवाहाबाबतचे दोन गुन्हे दाखल केलेले आहेत. आरोपी विरूद्ध कडक कारवाई सुरू केल्या आहे. यावेळी अशा प्रकारचा बालविवाह लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल. तसेच कायदेशीर दंड भोगावा लागेल. तरी कोणीही बालविवाह लावण्याचे चुकीचे धाडस करू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
