Homeव्हिडिओ बातम्याउल्लेखनीय योगदानाबद्दल पत्रकार स्वेता गायकवाड सन्मानित :डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचतर्फे विशेष कार्यक्रमाचे...

उल्लेखनीय योगदानाबद्दल पत्रकार स्वेता गायकवाड सन्मानित :डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन :

उल्लेखनीय योगदानाबद्दल पत्रकार स्वेता गायकवाड सन्मानित

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचतर्फे 

पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा

गुणगौरव सोहळा संपन्न ; आमदार रोहित पवारांचा विशेष सन्मान 

जामखेड प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रात शहरीभागात मोठ्या संख्येने महिला कार्यरत आहेत मात्र ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थिती आहे.अशाठीकाणी कु स्वेता गायकवाड यांनी पत्रकारीतेतुन उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

स्वेता गायकवाड पोलीस वारंटच्या संपादक आहेत.

समाजातील चांगले कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान व्हावा, अशा उपक्रमांना दरवर्षी माझ्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल,” असे त्यांनी सांगून कार्यक्रमाचे कौतुक केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, जामखेड तालुक्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार रोहित पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक नायगावचे माजी सरपंच शिवाजी भिवाजी ससाने म्हणाले की, “हा सुरुवातीचा टप्पा असून आगामी काळात सामाजिक व राजकीय अशा विविध उपक्रमांचे आयोजन मंचाच्या वतीने करण्यात येईल. यामध्ये प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळेल. तसेच दरवर्षी आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे.”या वेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, प्रकाश सदाफुले, बबनराव तुपेरे, बाळासाहेब आव्हाड, प्रा. विकी घायतडक, रावसाहेब जाधव, दिलीप मोरे, मंगेश आजबे, सागर कोल्हे, युवराज उगले, निखिल घायतडक, बापूसाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिजवान बागवान यांनी केले, तर आभार प्राचार्य विकी घायतडक यांनी मानले.कार्यक्रमाला महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!