दिवाळी सणाच्या निमित्ताने होमगार्ड बांधवांसाठी दिवाळी फराळ व बसण्यासाठी बाकड्यांची भेट
आकाश बाफना यांच्या आदर्श फाउंडेशनचा होमगार्ड बांधवांसाठी उपक्रम:
जामखेड प्रतिनिधी –
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुका होमगार्ड कार्यालय येथे आदर्श फाऊंडेशन तर्फे होमगार्ड बांधवांना दिवाळी फराळ भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच बांधवांच्या सोयीसाठी कार्यालय परिसरात बसण्यासाठी बाकड्यांची देण्यात आले.
या कार्यक्रमास तालुका समादेशक नागेश घायाळ,पलटन नायक अकबर शेख,शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे,पलटन नायक आण्णासाहेब पवळ, बिभिषण यादव, राजु जाधव, विठ्ठल जाधव, भारत चव्हाण, संजय साळुंके,
हरिश्चंद्र पवार, अतुल पवार, शिवाजी सातव, नासीर खान, किरण बांदल, निलेश गायकवाड, जितेंद्र जाधव, गणेश गायकवाड, विलास पवळ, बुध्दाप्पा माने, कुंडल औचरे तसेच शैला क्षिरसागर, शैला कदम, आशा रूपनर, राखी पवार आदी मान्यवर आणि होमगार्ड बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान आकाश बाफना यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बाफना म्हणाले, “ज्या प्रमाणे पोलिस दलावर जबाबदाऱ्या असतात,
त्याचप्रमाणे होमगार्ड बांधवही दक्षतेने काम करतात. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.दरम्यान, यंदा होमगार्ड बांधवांना दिवाळीपूर्वी मानधन न मिळाल्याने त्यांचा सण अंधारात असून याची दखल घेत आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी फराळ भेटवस्तू देऊन माणुसकी जपली.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 
