जामखेडमध्ये ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून अपघात
ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आणि टेललॅम्प लावण्याची
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचीमागणी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील कर्जत रोडवरील अपघातातील तरूणांचा अखेर मृत्यू झाला आहे.
सध्या परिसरात ऊसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. अनेक ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आणि टेललॅम्प नाहीत. यामुळे अनेक अपघात होतात.
तेव्हा अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आणि टेललॅम्प लावावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.
दि ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कर्जत रोडवर उसाच्या डबल ट्रॅक्टर ट्रॉलीखाली अविनाश विक्रम आढाव वय ३० रा. धानोरा ता जामखेड हा तरूण धडकून जबर जखमी झाला होता. मोटरसायकल वरून येत असताना ट्रॅक्टर डबल ट्रॉल्या त्या तरूणाच्या लक्षात आली नाही. ट्रक्टरबरोबर तो १०० फूट फरपटत गेल्यामुळे तो जबर जखमी झाला.
सदर घटनेची माहिती संदीप सांगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी ताबडतोब दीपक भोरे आणि ऋषीकेश शेळके यास रुग्णवाहिका घेऊन पाठवले. सदर अपघातात तरूणांचा पाय तुटून साईडला पडला होता. ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या लक्षात न आल्याने त्याच्या पायाचा चेंदा रेंदा झाला होता. त्या तरुणाला दवाखान्यात आणले परंतु त्याचा मृत्यू झाला.
रात्रीच्या अंधारात डबल ट्रॅक्टर ट्रॉली दिसत नाहीत. यामुळे बरेच अपघात होत आहेत. ही घटना ताबडतोब जामखेड येथील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना फोन द्वारे सांगितली. जामखेड तालुक्यातुन ऊस वाहतूक करणारया ट्रॅक्टर वाहनांना ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आणि टेललॅम्प लावण्याची सक्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.